Thursday, April 18, 2024

लेकाने दिग्दर्शित केलेल्या जाहिरातीत झळकला ‘हा’ सुपरस्टार, सोशल मीडियावर टिझर शेअर करत व्यक्त केला आनंद

हिंदी सिनेसृष्टीतील किंग खान अर्थात शाहरुख खानचे सर्वच फॅन्स आहेत. शाहरुख खान नेहमीच विविध कारणांमुळे लाइमलाईट्मधे असतो. अशातच आता शाहरुख खान त्याच्या लेकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळेस त्याला त्याच्या मुलावर अभिमान वाटावा असे काही तरी घडले आहे. शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन खानने दिग्दर्शित केलेल्या एका जाहिरातीच्या ब्रँडचा टिझर आहे. आपल्या मुलाच्या दिग्दर्शनाखाली शाहरुखने या जाहिरातीमध्ये काम केले आहे.

नुकतीच शाहरुख खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका जाहिरातीचा टिझर आपल्याला पाहायला मिळत आहे. यात शाहरुखची एक झलक देखील पाहायला मिळत आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे हा व्हिडिओ किंबहुना ही जाहिरात शाहरुख खानच्या मुलाने आर्यन खानने दिग्दर्शित केली आहे. ही जाहिरात लवकरच पूर्ण प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

एक वडील या नात्याने आपल्या मुलाच्या दिग्दर्शनात काम करणे हे शाहरुख खानसाठी खूपच अभिमानस्पद आणि आनंददायी होते. दरम्यान याआधी देखील शाहरुख आणि आर्यन यांनी एकत्र काम केले आहे. डिज्नीचा सिनेमा असलेल्या ‘लायन किंग’मध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून शाहरुख आणि आर्यन यांनी एकत्र काम करत आपला आवाज या सिनेमाला दिला आहे. शाहरुख खानची ही पोस्ट पाहून त्याचे फॅन्स चांगलेच खुश झाले आहे. सर्वांनाचा आता या जाहिरातीची प्रतीक्षा आहे. आता आर्यन खानने दिग्दर्शित केलेली जाहिरात पाहून अनेकांनी तो दिग्दर्शनात करियर करणार की, अभिनयात असे प्रश्न देखील त्याला विचारले आहे?

दरम्यान पठाण सिनेमाच्या अभूतपर्व यशानंतर शाहरुख लवकरच त्याच्या ‘जवान’ या सिनेमात दिसणार आहे. येत्या २ जून २०२३ रोजी जवान प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. शिवाय तापसीसोबत तो डंकीमध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अनुपम काका, पापा तुमच्यापेक्षा चांगला डान्स करायचे, पण…’ सतीश कौशिक यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल

अर्चना गौतम कॅमेऱ्यासमोर झाली बोल्ड, अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

हे देखील वाचा