Friday, March 29, 2024

मनोरंजन व्हाया वेबसिरीज! हॉलिवूडमधील ‘या’ प्रमुख १० वेबसीरिज ठरतायेत प्रचंड लोकप्रिय, विकेंडमध्ये पाहायला नका विसरू

नेटफ्लिक्सवर वेब-आधारित टीव्ही कार्यक्रम पाहण्यासाठी एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. सन २०२० वर्ष हे सर्वांसाठीच त्रासदायक ठरलं होतं. मनोरंजन विश्वाला याचा सर्वाधिक फटका बसला होता. देशभरात अनेक चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळविला होता. त्यावेळी ओटीटीवर वेब सीरिज पाहणं प्रत्येकाने पसंत केले होते. सध्या नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असंख्य वेबसीरिज उपलब्ध आहेत. यांपैकी काही अशा वेबसीरिज आहेत ज्या पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग फारच उत्सुक असल्याचे दिसून येते.

यापैकी अशा काही हॉलिवूडमधील अनेक वेबसीरिज आहेत, ज्या पाहताना प्रेक्षकांना कंटाळा तर येणार नाहीच, पण  कॉमेडीपासून ते गूढ कथेचा समावेश देखील यात असणार आहे. अशाच काही वेबसीरिज बद्दल आपण जाणून घेऊयात,

१. लुपिन
या वेबसीरिजची कथा एका चोरावर आधारित आहे, जो सर्व घटनेचा मुख्य सूत्रधार असतो. ही एक फ्रेंच सीरिज आहे. ज्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे. या सीरिजवर एक ऍनिमेटेड चित्रपट देखील बनविण्यात आला आहे.

२. व्हेन दे सी अस
सन १९९० च्या सत्यघटनेवर ही आधारित कथा आहे. ज्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा समावेश आहे. ही कथा आपले हृदय हेलावून टाकणारी आहे. न्यूयॉर्कमधील पाच कृष्णवर्णीय पुरुषांवर ही कथा आधारित आहे. ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप लागला होता.

३. द क्रॉउन
या सीरिजमध्ये अभिनेत्री ऑलव्हिया कोलमन ही एलिझाबेथ २ च्या भूमिकेत दिसत आहे. राणीच्या साम्राज्यातील अनेक चढ उतारांचा यात समावेश असून राजघराण्यातील कामकाज कशा पद्धतीने चालते हे यात दाखविले गेले आहे.

४. अन ऑर्थोडोक्स
ही सीरिज डेबोराह फेल्डमॅनच्या ऑटो बायोग्राफीवर आधारित आहे. जर्मन-अमेरिकनच्या या पहिल्या सीरिजला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

५. द लास्ट किंगडम
ही वेबसीरिज ब्रिटिश ऐतिहासिक काल्पनिक कथेवर आधारित आहे. या कथेला बर्नार्ड कॉर्नवेलच्या कादंबरी ‘द सॅक्सन स्टोरीज’ मधून घेतले आहे.

६. वन डे ऍट अ टाइम
ही वेबसीरिज सन १९७५च्या वन डे ऍट अ टाइम कार्यक्रमाचा रिमेक आहे. या सीरिजची कथा क्युबा-अमेरिकन कुटुंबावर आधारित आहे, ज्यामध्ये एकट्या आईवर तीन मुले सांभाळायची जबाबदारी आहे.

७. ग्लो
ग्लो ही वेबसीरिज पाहणे फारच मजेशीर ठरणार आहे, जी एक विनोदी सीरिज आहे. ज्यात मैत्री आणि प्रेमाचे समर्थन इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे.

८. अलाईस ग्रेस
अलाईस ग्रेस ही मालिका मार्गरेट अटवूडच्या कादंबरीवर आधारित कॅनेडियन सीरिज आहे. जी एक सत्य घटनेवर आधारित आहे. या कथेत एक गरीब नोकरावर त्याच्या मालकाच्या खुनाचा आरोप आहे.

९. डेड टू मी
डेड टू मी ही एका महिलेच्या जीवनावर आधारित कथा आहे, जिच्या पतीच्या मृत्यूमुळे तीला जबर धक्का बसला आहे. अभिनेत्री क्रिस्टिना अप्लिगेट ही भूमिका अतिशय मजेदार मार्गाने साकारत आहे.

१०. ऑन माय ब्लॉक
ऑन माय ब्लॉक या वेबसीरिजमध्ये तीन विनोदी नाटक आहे. यात चार मित्रांची कथा दाखवली गेली आहे.

या अशा वेबसीरिज आपण नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांसारख्या माध्यमातून पाहत असता. या डिजिटल युगात या वेब सीरिज सुद्धा माहितीचा एक स्रोत आहे. प्रत्येक नवीन कथा या नवीन अनुभव घेऊन येत राहत असतात यात तिळमात्र शंका नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये मैं हू, ये मेरा घर है और यहा…’, राखी सावंतने शेयर केला व्हिडिओ; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

-नेहा कक्कर अन् गुरु रंधावा प्रथमच आले एकत्र, पाहा या जोडीचे ‘और प्यार करना है’ हे ताजं गाणं

-भारतीय सैनिकाच्या पत्नीच्या व्यथा सांगणारं ‘तुम बिन’ गाणं युट्यूबलर करतंय राडा, हिट्सचा पडतोय पाऊस

हे देखील वाचा