Thursday, March 28, 2024

‘धकधक गर्ल’ डिजीटल पदार्पणास सज्ज, रिलीझ झाला आगामी ‘फाइंडिंग अनामिका’चा धमाकेदार टीझर

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हे चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात माधुरी दीक्षितचे चाहते आहेत. तिच्या अदाकारीचे आणि सौंदर्याचे चाहते दिवाणे आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. इतकेच नव्हे तर तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच वाट पाहत असतात. हीच चाहत्यांची आतुरता आता संपली आहे. कारण येत्या काही दिवसांतच माधुरी दीक्षितची एक वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘फाइंडिंग अनामिका’ ही वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मात्र त्या अगोदर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती अशी की, नुकताच या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा टीझर माधुरीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरं तर, माधुरी मागील बऱ्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

करण जोहर माधुरीच्या या चित्रपटाचा देखील निर्माता आहे. इंस्टाग्रामवर या चित्रपटाचा टीझर शेअर करत माधुरीने कॅप्शन लिहिले की, “तुम्ही अनामिकाला भेटायला तयार आहात का? नेटफ्लिक्सवर ‘फाइंडिंग अनामिका’ लवकरच येत आहे.” माधुरीने हा टीझर शेअर करताच, याला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

त्याचबरोबर माधुरीचे चाहते या पोस्टवर कमेंट करून उत्साह व्यक्त करत आहेत. या व्हिडिओमधून हे स्पष्ट होते की, तिने खऱ्या जीवनाप्रमाणेच चित्रपटात सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला माधुरी चाहत्यांनी आणि पॅपराजींनी वेढलेली दिसते. तेवढ्यात मागून एका माणसाचा आवाज येतो. जो विचारतो की, “तर मला सांगा, अनामिका आनंद होणे कसे वाटते?” यावर माधुरी म्हणते, “बरं वाटतं, खरं सांगू, इतक्या वर्षांनंतरही हे आयुष्य खरं वाटत नाही. मी स्वतःला भाग्यवान समजते. कोणाचीही दृष्ट नको लागायला.”

चित्रपटाची कथा एका सुपरस्टारची आहे. जो एक दिवस अचानक गायब होतो. या चित्रपटाचे लेखन श्री राव आणि निशा मेहता यांनी केलेले आहे. माधुरी व्यतिरिक्त संजय कपूर, सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी आणि मानव कौलसारखे कलाकार या चित्रपटात आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा