×

बॉलिवूडमध्ये हॅकिंगवर तयार झालेल्या ‘या’ चित्रपटांमधून दिसले तंत्रज्ञानाचे भयानक रूप

आजच्या आधुनिक काळातील व्यक्तीचे जीवन संपूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून झाले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या तंत्रज्ञानाचा एवढा मोठा प्रभाव आहे की, लहानातल्या लहान गोष्टीपासून मोठ्यापर्यंत सर्वच बाबी पूर्ण करण्यासाठी पण याच तंत्रज्ञानाची मदत घेत आहोत. मात्र कोणत्याही गोष्टीला नेहमीच दोन बाजू असतात. अगदी तसेच यालाही दोन बाजू आहे. एकीकडे आपले जीवन सुकर करण्यासाठी वापरले जाणारे हे तंत्रज्ञान दुसरीकडे आपलीच डोकेदुखी वाढवणारे आहे. कारण याच तंत्रज्ञानाला हॅकर्स हॅक करून आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती, बँकेची माहिती, सुरक्षेच्या संदर्भातली माहिती मिळवून त्याचाच गैरवापर करू शकतात. याच विषयावर बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमे तयार झाले आहेत चला तर जाणून घेऊया त्याबद्दल.

हॅक्ड :
हिना खानची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात १९ वर्षाचा मुलगा सॅम नावाच्या मुलीवर खूप प्रेम करतो मात्र तिने नकार दिल्यानंतर तो तिचा फोन, लॅपटॉप, इमेल हॅक करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले असून, यात रोहन शाह मुलाने हॅकरची भूमिका साकारली आहे.

जीनियस :
सायबर हॅकिंगवर आधारित असलेल्या या सिनेमात इंजीनियरिंग कॉलेज पासून लेकर रिसर्च एंड डेवलपमेंट विंग (रॉ) पर्यंतची कथा दाखवण्यात आली आहे. अनिल शर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा, इशिता चौहान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयशा जुल्का मुख्य भूमिकेत होते, मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला.

हॅप्पी न्यू इयर :
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या या सिनेमात हँकिंगच्या माध्यमातून एका मोठ्या चोरीला घडवले जाते. फराह खानच्या या सिनेमात सोनू सूद, बोमन इराणी, विवान शाह, अभिषेक बच्चन महत्वाच्या भूमिकेत होते.

मिकी व्हायरस :
या कॉमेडी सिनेमात हँकिंगद्वारे बँकेत चोरी केली जाते. सूत्रसंचालक म्हणून ओळख मिळवलेला मनीष पॉल या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. मात्र हा सिनेमा फ्लॉप झाला.

प्रिंस :
२०१० साली आलेल्या या सिनेमात फाय तंत्रज्ञान दाखवले गेले. या सिनेमात अशी चिप दाखवली गेली जी स्मरणशक्ती संपवू शकते. विवेक ओबेरॉयचा हा सिनेमा जोरदार आपटला होता.

हेही वाचा-

Latest Post