Tuesday, April 23, 2024

धक्कादायक! हिंदी, भोजपुरीमध्ये काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपांतर्गत अटक

भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रिपोर्ट्सनुसार मुंबईमध्ये सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली तिला मुंबईच्या क्रेम ब्रँचने अटक केली आहे. तिच्यासोबत असणाऱ्या ३ मॉडेल्सला पोलिसांनी रेस्क्यू देखील केले. सध्या पोलीस पुढील तपस करत असून एका आठवड्यामध्ये या रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या अभिनेत्रीला अटक करण्यात पोलिसाना यश आले आहे. दरम्यान सुमन मागील सहा वर्षांपासून मुंबईमध्ये राहत होती. मात्र ती या रॅकेटमध्ये किती दिवसांपासून आहे याबाबत अद्याप कोणताच खुलासा केला गेला नाही.

या प्रकरणाबाबत बोलताना मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “विशेष सूचनेच्या आधारावर आम्ही छापेमारी केली आणि आरोपीना अटक केली आहे.” अधिकाऱ्यांनी अभिनेत्रींना पैसे देणाऱ्या डमी लोकांना पाठवत ही छापेमारी केली. सुमनने एका मुलींसाठी ५०-८० हजार रुपये घेतले आणि तीन मुलींना आरे कॉलनी येथील रॉयल पाम हॉटेलमध्ये पाठवले. या छापेमारीमध्ये पोलिसांनी तीन मुलींना ज्यांना या व्यवसायात काम करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती त्यांना देखील मुक्त केले.

दरम्यान सुमन यादवबद्दल सांगायचे झाले तर तिला सुमन कुमारी टॅटू नावाने ओळखले जाते. तिने भोजपुरी इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात ‘लैला मजनू’, ‘जोमेस्टिक बॉक्स’, ‘बाप नंबरी और बेटा 10 नंबरी’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे. सोबतच ती काही पंजाबी आणि हिंदी म्युझिक अल्बम देखील झळकली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा