वयाच्या १४ व्या वर्षी बनायचे होते ‘फादर’, बालपणी वडिलांचा खाल्लाय त्याने खूप मार; तर असा होता टॉम क्रुझचा संघर्षमय प्रवास


जीवनाच्या कोणत्याही टप्यात जर तुम्ही कधी टेन्शनमध्ये असाल किंवा आयुष्यात आता काहीच चांगलं होत नाही असं वाटलं, तर एकदा हॉलिवूडमधील ‘या’ कलाकाराच्या आयुष्यावर नक्कीच नजर टाका. कदाचित तुम्ही टेन्शनमधून बाहेर येऊ शकता किंवा आहे त्या परिस्थितीला टक्कर देऊ शकता. हा अभिनेता म्हणजे टॉम क्रुझ. ‘टॉप गन’, ‘मिशन इम्पॉसिबल’ आणि ‘अमेरिकन मेड’ यांसारख्या चित्रपटात दमदार अभिनय करणारा टॉम क्रुझचा या वयात देखील चाहता वर्ग खूप मोठा‌ आहेत. टॉम आज त्याचा ५९ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्याने त्याच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी किती संकटांचा सामना केला आहे. ( Tom cruise birthday : some interesting and unknowing fact about him)

अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या टॉमचे बालपण इतर मुलं प्रमाणेच साधे सरळ नव्हते. टॉम क्रुझने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, लहान असताना त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अजिबात चांगली नव्हती. त्याचे वडिल लहान असताना त्याला खूप मारत असायचे. परंतु त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने त्याच्या वडीलांकडून खूप काही शिकले आहे.

टॉम क्रुझचा जन्म ३ जुलै १९६२ साली न्यूयॉर्कमध्ये झाला होता. केवळ ११ वर्षांचा असताना, त्याचे आई वडिल वेगळे झाले होते. त्यावेळी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी टॉम बागेत लॉन कापण्याचे वैगेरे काम करत असायचा. टॉम हा एका कॅथेलिक परिवारात वाढला आहे. याचा परिणाम असा की, वयाच्या १४ व्या वर्षी त्याला फादर व्हायचे होते.

परंतु टॉमसोबत झालेल्या एका प्रसंगाने त्याचे हे स्वप्न मोडले. चर्चमध्ये एका फादरच्या खोलीमधून दारू चोरताना टॉम पकडला गेला होता. त्यानंतर त्याला फ्रांसिस्कन सेमिनॅरी स्कूलमधून काढले होते. त्यामुळे त्याचे फादर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलं.

एके दिवशी त्याच्या एका शिक्षकाने त्याला ॲक्टिंग क्लास जॉईंड करायला सांगितला. त्यानंतर टॉमने ॲक्टिंगचे ट्रेनिंग सुरू केले. या ट्रेनिंगमध्ये त्याला त्याचे डायलॉग आठवत नसायचे. त्याने व्हिज्युअल लर्निगमधून आठवायला जोर दिला. हा तो काळ होता, जेव्हा एक गोष्ट मिळाली होती त्यामुळे सहजतेने सगळ्या गोष्टी करत होता.

छोट्या मोठ्या चित्रपटात काम केल्यानंतर १९८३ मध्ये त्याचा ‘रिस्की बिजनेस’ हा चित्रपट आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. या चित्रपटानंतर तो नावारूपाला आला होता. आज टॉमची गणना हॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांमध्ये होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.