Tuesday, April 16, 2024

सत्य घटनांवर आधारित हे चित्रपट एकट्यात पाहण्याची चूक कधीच करू नका

बॉलीवूडमध्ये अनेक जॉनर चित्रपट बनवले जातात, कोणाला रोमँटिक चित्रपट आवडतात, तर कोणाला कॉमेडी किंवा अॅक्शन पाहायला आवडते. त्याच वेळी, असे बरेच लोक आहेत ज्यांना हॉरर म्हणजेच भयपट पाहायला आवडतात. भूतांवर बनलेले चित्रपट लोकांनी खूप पाहिले असतील, पण खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट लोकांना घाबरवण्यात बर्‍याच अंशी यशस्वी होतात. त्यातील हे आहेत काही चित्रपट जे तुमच्यात हिम्मत असेन तरच पाहा.

क्वेश्चन मार्क
हा चित्रपट मित्रांच्या एका ग्रुपबद्दल आहे जो चित्रपट बनवण्यासाठी एका ठिकाणी जातो परंतु परत येत नाही. नंतर त्यांचे कॅमेरे सापडतात ज्यात घडलेल्या घटना टिपणारे धक्कादायक फुटेज समोर याते. हा चित्रपट एका अर्धवट सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यात मित्रांच्या एका ग्रुपने रात्रभर एका झपाटलेल्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतलेला परंतु ते परत आले नाही. नंतर, त्यांचा कॅमेरा शोधून काढण्यात आला आणि फुटेजमधून त्यांचे नेमके काय झाले हे उघड झाले.

ट्रिप टू भानगढ
हा चित्रपट 2014 मध्ये आला होता, ज्यामध्ये मित्रांचा एका ग्रुपने भानगडला भेट देण्याची योजना आखतो, भानगड हे भारतातील सर्वात झपाटलेले ठिकाण मानले जाते. किल्ल्यात रात्रभर मुक्काम करण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली होती. भानगडमधील प्रत्येकाला अनेक अलौकिक अनुभव येतात. हा चित्रपट भानगडमधील अनेक घटना अनुभवलेल्या लोकांच्या अनेक वास्तविक जीवनातील घटनांवरून प्रेरित आहे.

रागिणी एमएमएस
हा चित्रपट 2011 मध्ये आला होता, ज्यामध्ये एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली होती जे एका बंगल्यात रात्र घालवायला जातात. पण त्यांच्यासोबत अनेक विचित्र घटना घडतात, ज्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतात. चित्रपटाची कथा दिल्लीतील एका तरुणीच्या प्रत्यक्ष अनुभवावरून प्रेरित आहे. रिपोर्ट्सनुसार, मुलीने चित्रपट बनवण्यापूर्वी बालाजी टेलिफिल्म्ससोबत करारही केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ट्विंकलला मारण्यासाठी आमिर खानने चक्क उचलला हात, वाचा संपुर्ण किस्सा
उर्फी जावेदच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘मी तिला थोबडवून काढेन…’

हे देखील वाचा