‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत मधुरा वेलणकर साकारणार अनोखी भूमिका, प्रोमो आला समोर


आई ही आपल्या आयुष्यातील अशी एक व्यक्ती असते जी प्रत्येक प्रसंगात आपल्यासोबत असते. मुलांनी चांगली काम केले, तर पाठ थोपटणारी आई असते आणि मुलांनी शंभर चुका केल्या तरी त्या चुका पदरात घेणारी आईच असते. अशी आईची अनेक रूपं आपण आपल्या दैनंदिन असतो. अशातच अशीच एक कहाणी असणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठीवर एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ ही नवीन मालिका प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. 

आई कोणत्या ही रूपात मुलांच्या स्वरक्षणासाठी येत असते. वेळ पडली तर ती तिचा जीव देऊ शकते तसा ती एखाद्याचा जीव घेऊ देखील शकते. ती मुलासाठी हिरकणी बनून गड उतरूनही येऊ शकते, तर ती जिजाऊंप्रमाणे संस्कार देऊन समाजाला एक ढाण्या वाघही देऊ शकते. अशीच कहाणी असणारी कहाणी सोनी मराठीवर येणार आहे. सोनी मराठीवर येणाऱ्या प्रत्येक मालिकेची कहाणी काहीतरी वेगळी आणि रंजक असते. ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेचे प्रोमो मागील अनेक दिवसापासून टीव्हीवर आणि सोशल मीडियावर चालू झाले आहेत. एक शिक्षिका, एक कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीच्या जीवावर बेतल्याने वाघीण झालेली आई या अशा धाडसी भूमिकेत मधुरा वेलणकर दिसणार आहे. २० डिसेंबरपासून, सोम.-शनि. रात्री १० वा. प्रेक्षकांना ही मालिका पाहायला मिळणार आहे. (Tumchi Mulgi kay karte serial will start on sony marathi )

या मालिकेतून एक थरारक कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे कथा-पटकथा लेखन अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर, तर संवाद लेखिका मुग्धा गोडबोले लिहित असल्याने ते संवाद मनाला भिडणारे असतील यात शंका नाही. पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी अशा प्रकारची एक थरारक मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. मालिकेची निर्माती मनवा नाईक असून, राष्ट्रीय पुरस्कार विजते दिग्दर्शक भीमराव मुडे मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.

मालिकेचा प्रोमो सोनी मराठीवर शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करून लिहिले आहे की, “आई मुलीसाठी जीव देऊ शकते आणि वेळ पडली तर…..नवी मालिका – ‘तुमची मुलगी काय करते?’ २० डिसेंबरपासून, सोम.-शनि., रात्री १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.” मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा :

गायत्री दातारची ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून एक्झिट, ऐंशी दिवसांचा प्रवास पाहून झाली भावुक

बॉलिवूडच्या ‘या’ जोडप्यांनी शानदार लग्न करत खर्च केला पाण्यासारखा पैसा

‘कोणा-कोणाच्या घरात आज न्यूजपेपर आला नाही,’ भन्नाट फोटोवर शालूचीच भन्नाट कमेंट

 


Latest Post

error: Content is protected !!