‘बुलेट राजा‘, ‘दम लगा के हईशा‘ यांसारख्या अनेक चित्रपटांव्यतिरिक्त ओटीटीच्या दुनियेतही आपले अप्रतिम अभिनय कौशल्य दाखवणार अभिनेता शान मिश्रा अडचणीत सापडला आहे. खरे तर, चित्रपटात शानसोबत काम केलेल्या को-अॅक्ट्रेसने अभिनेत्यावर बला’त्काराचा आरोप केला आहे. 13 मार्च रोजी अभिनेत्रीने या प्रकरणाबाबत मुंबईतील बांगर नगर येथील लिंक रोड पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीत, अभिनेत्रीने शानवर तिचे 4 लाख रुपये परत न करणे, पैशासाठी तिचा वापर करणे, फसवणूक करणे आणि पकडल्यास धमकावणे असे आरोप केले आहेत.
माध्यामातील वृत्तानुसार, को-अॅक्ट्रेसने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, “मी डिसेंबर 2001मध्ये शानला पहिल्यांदा भेटले होते. आम्ही एका टीव्ही शोसाठी एकत्र काम केले. इथूनच आमची मैत्री झाली आणि जानेवारी 2022मध्ये आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 9 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या घरी एक पार्टी होती, त्याच दिवशी आम्ही पहिल्यांदा इंटिमेट झालो. लग्नापूर्वी मला शारीरिक संबंध ठेवायचे नव्हते. मात्र, तो लग्नाच्या बहाण्याने माझ्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत होता. काही महिने सर्व काही ठीक होते, मग जुलैमध्ये मी त्याला कॉल केला. मात्र, माझा फाेन काॅल एका मुलीने उचलला, मग तिच्या बोलण्याच्या पद्धतीनं माझ्या मनात शंका निर्माण झाल्या.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी जेव्हा शानला याबद्दल विचारले, तेव्हा त्याने ती मुलगी त्याची जवळची मैत्रीण असल्याचे सांगितली. मी होकार दिला, मग त्या मुलीने शानच्या बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात मी देखील गेले होते. मात्र, तिने तिथे सर्वांसमोर माझ्याशी गैरवर्तन केले आणि मला घराबाहेर हाकलून दिले. त्या मुलीसोबत त्याने माझी फसवणूक केल्याचे हळूहळू मला कळले. यानंतर मी त्याला स्पष्टपणे सांगितले की, मला त्याच्यासोबत राहायचे नाही. इथे त्याला नकार सहन झाला नाही आणि तो मला धमक्या देऊ लागला. त्याने माझ्याकडून फार पूर्वी घेतलेले चार लाख रुपये देण्यासही नकार दिला. उलट त्याने माझ्याविरुद्धच गोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये मी त्रास देत असल्याची तक्रार दाखल केली.”
माध्यमातील वृत्तानुसार, को-अॅक्ट्रेसच्या तक्रारीनंतर शान मिश्राविरुद्ध आयपीसीच्या कलम 376(2)(n), 377, 506, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, अभिनेत्याच्या वकिलाने त्याच्यावर लावलेले प्रत्येक आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाबाबत वकील शैलेंद्र मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, “अभिनेता 2021च्या पूर्वीपासूनच दुसर्या महिलेशी रिेलशनशिपमध्ये होता आणि तक्रारदाराला त्याबद्दल सर्व माहिती होती. असे असतानाही तिने शानसोबत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. को-अॅक्ट्रेस शानला बर्याच काळापासून त्रास देत होती, ज्यामुळे त्याने तिला खूप पूर्वीपासून ब्लॉक केले होते. अभिनेत्याच्या वकिलाचे म्हणणे आहे की, शानने कधीही अभिनेत्रीला हातही लावला नाही, त्यामुळे बला’त्काराचा प्रश्नच उद्भवत नाही.” अशात सध्या मुंबईच्या सत्र न्यायालयाने अभिनेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.(tv actress accuses actor shaan mishra of rape and cheating )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस
सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’