Tuesday, March 5, 2024

राखी सावंतचा घटस्फाेटाबाबत बदलला विचार? म्हणाली, ‘मला मुक्त व्हायचे…’

बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ती नेहमीच छोटी गोष्टी देखील मीडियासमोर खूप मोठी करून सांगण्यात पटाईत आहे. मागील अनेक दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. तिचे आदिल खान दुर्रानीसाेबतचे लग्न एक महिना देखील नीट टिकले नसावे तोपर्यंत त्यांच्यात खटके उडाले आणि राखीने त्याच्या विरोधात पोलीस तक्रार देखील केली. राखीच्या म्हणण्यानुसार, आदिलने तिची फसवणूक केली, पण असे असूनही ती त्याला घटस्फोट देण्यास तयार नव्हती. अशात आता अभिनेत्रीने आपला विचार बदलला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

अलीकडेच राखी सावंत (rakhi sawant) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर मीडियाशी संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मंडळी, राखीचा हा व्हिडिओ पत्रकार परिषदेचा आहे, ज्यामध्ये राखी पती आदिल खान दुर्रानी (adil khan durrani) सोबतच्या घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलली आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे की, “मी लवकरच घटस्फोट घेणार आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

यासाेबत राखी पुढे म्हणाली, “आता मला मुक्त होऊन आयुष्यात पुढे जायचे आहे. त्यामुळे आदिल खान दुर्रानीला जिच्याशी लग्न करायचे आहे, ते त्याने करावे मला त्याची काहीही पर्वा नाही. मला या सगळ्यातून बाहेर पडून मोकळे व्हायचे आहे.” तसेच, राखी सावंतने तिच्या आगामी वेब सीरिजबद्दलही सांगितले आहे की, ती भोजपुरी सुपरस्टार रवी किशनसोबत लखनऊमध्ये वेब सीरिज शूट करणार आहे. (tv actress rakhi sawant reaction on her divorce with husband adil khan durrani)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखीने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल लाेटपाेट

‘भीतीपेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवला’ अभिज्ञा भावेने पोस्टमधून शेअर केला तिचा खास अनुभव

हे देखील वाचा