भारीच ना! ‘क्राइम पेट्रोल’मधील अभिनेत्याने लॉकडाऊनमधील वेळ लावला सत्कारणी; पूर्ण केला ‘हा’ कोर्स


काही कलाकार असे असतात, जे मोठ्या पडद्यावर न झळकताही छोट्या पडद्यावर काम करून आपली एक विशेष ओळख निर्माण करतात. तसेच चाहत्यांच्या मनात कायमचे घर करून जातात. असाच एक टीव्ही अभिनेता म्हणजे अनुप सोनी होय. टीव्हीवरील ‘क्राइम पेट्रोल’ या प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अनुप देशातील घराघरात पोहोचला आहे. यातून त्याने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या प्रेक्षकांना इम्प्रेस केले आहे. अनुप मागील अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. अशातच अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत मिळवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

खरं तर अभिनेत्याने लॉकडाऊनचा फायदा घेत ऑनलाईन इन्व्हेस्टिगेशन कोर्स पूर्ण केला होता. आता त्याने त्याचे प्रमाणपत्र दाखवत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. (Crime Patrol Host Anup Soni Completed Investigation Course During Lokcdown)

त्याने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी लॉकडाऊनचा फायदा घेत क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रमाणपत्र कोर्स करण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून मी आपली शक्ती आणखी जास्त रचनात्मक कामांमध्ये लावू शकेल. मात्र, वास्तवात अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा शिक्षणाचे धडे घेणे आव्हानात्मक होते. असे असले, तरीही मी याची निवड केली आणि याचा मला अभिमान आहे की, मी हा कोर्स पूर्ण केला.”

इन्व्हेस्टिगेशन कोर्स केल्यानंतर मिळाले प्रमाणपत्र
अनुपने शेअर केलेल्या या प्रमाणपत्रावर लिहिले आहे की, “आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान International Forensic Sciences (IFS) द्वारे हे प्रमाणित केले जाते की, श्री अनुप सोनी यांनी क्राइम सीन इन्व्हेस्टिगेशनमधील शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला.

वेबसीरिज ‘तांडव’मध्ये दिसला होता अनुप सोनी, ‘या’ शोमध्ये आहे प्रसिद्ध
अनुप यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये झळकला होता. अनुपने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन १९९९ मध्ये आलेल्या ‘गॉडफादर’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने ‘फिजा’, ‘दीवानापन’, ‘खुशी’, ‘कर्कश’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

मोठ्या पडद्यावरून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अनुपला सिल्व्हर स्क्रीनवर यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने अनेक प्रसिद्ध मालिकेत काम केले आहे. त्याने ‘बालिका वधू’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘शांति’, ‘रात होने को है’, ‘कहानी घर घर की’, ‘रिमिक्स’, ‘ब्योमकेश बक्शी’, ‘तहकीकात’, ‘आहट’ यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. तरीही अनुपला सर्वाधिक प्रसिद्धी ही ‘क्राइम पेट्रोल’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल्यामुळेच मिळाली. तसेच त्याचा डायलॉग ‘सावधान रहिए, सतर्क रहिए’ हादेखील प्रेक्षकांमध्ये कमालीचा चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.