Friday, June 14, 2024

ट्विंकल खन्ना एकेकाळी होती डिंपल कपाडियाची कुली, जाणून घ्या ही मायलेकीची कहाणी

अक्षय कुमारची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करत असते. तिचा विनोदी स्वभाव देखील चाहत्यांना खूप आवडतो. चित्रपटापासून दूर असली, तरीही तिला पुस्तकांची खूप आवड आहे. ती नेहमीच पुस्तकांसोबत तिच्या थ्रोबॅक स्टोरी शेअर करत असते. नुकतेच तिने तिची आई डिंपल कपाडियासोबतची एक मजेशीर स्टोरी शेअर केली आहे. जी कदाचित कोणाला माहित नसेल.

ट्विंकल खन्ना तिच्या आईवर खूप प्रेम करते. ती नेहमीच तिच्या आईसोबतचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने एक जुना फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने भावना सोमया यांच्या ‘ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा’ मधील एक गोष्ट सांगितली. तिने सांगितले की, तिची आई विमानतळावर साहित्य सांभाळत होती. (Twinkle Khanna when used to be dimple Kapadia cookie know intresting story of mother daughter)

ट्विंकल खन्नाने दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो पुस्तकाचे कव्हर पेज आहे तर दुसरा फोटो पुस्तकातील आतील पेज आहे. यात तिने तिची कुली होण्याची कहाणी लिहिली आहे. ही पोस्ट शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या भूतकाळातील स्नॅपशॉट, हे पुस्तक भावना सोमया यांनी लिहिले आहे. हे माझ्यासाठी काही आठवणीतले क्षण घेऊन आले आहेत.”

https://www.instagram.com/p/CWxhF9So8nB/?utm_medium=copy_link

पुस्तकातील जे तिने शेअर केले आहे. त्यात लिहिले आहे की, “१९९४ मध्ये भावना सोमया यांची भेट डिंपल कपाडिया आणि त्याच्या मुलीशी विमानतळावर झाली होती. ट्विंकल खन्नाकडे खूप साहित्य होते. ती एका खुर्चीवर बसलेली दिसत होती. डिंपल एक अभिनेत्री होती त्यामुळे तिच्या आजूबाजूला बॉडीगार्ड होते.”

यावर ट्विंकल म्हणाली की, “माझ्या भविष्याबाबत मी सांगू शकत नव्हते. त्यावेळी माझी आई माझ्यासाठी स्पॉटबॉयचे काम करत होती. जेव्हा तिला विचारले की असे का? तेव्हा तिने सांगितले की, “कारण आईला बॅग चेक करायला अजिबात आवडत नसत. तिला लँडिंगवर वाट पाहणे आवडत नसत.”

ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या अशा अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. डिंपल या त्यांच्या काळातील एक सुपरहिट अभिनेत्री होत्या. त्यांच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे सर्वत्र नेहमीच चर्चा चालू असायची. ट्विंकलने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. परंतु सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती तिचा सगळा वेळ तिच्या कुटंबासोबत घालवते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडून असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा