Monday, March 4, 2024

रणबीर- रश्मीकाच्या चित्रपटात ‘हा’ मराठमोळा अभिनेता खाऊन गेला भाव, अजय- अतुलच्या गाण्याने केला कल्ला

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. रणबिर कपूरचा लूक पाहून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांचे उत्सुकता वाढलेली होती. या चित्रपटांमध्ये अनिल कपूर रणवीर कपूर बॉबी देओल रश्मिका मंदाना अशी तगडी स्टार कास्ट आहे. परंतु या चित्रपटात एक मराठमोळा अभिनेता देखील आहे त्याचे देखील सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

ॲनिमल हा चित्रपट सगळ्यांना आवडला असला तरी ॲनिमलमध्ये मराठमोळे अभिनेते उपेंद्र लिमये झळकले आहेत. आणि त्यांनी या सिनेमात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे त्यांच्यामुळे या ॲक्शन सीनला खूपच रंगत आलेली आहे. त्यांनी साकारलेली ही छोटी भूमिका सगळ्यांना खूपच आवडलेली आहे.

त्यासोबतच अजय अतुल यांचे डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला हे गाणे देखील चांगले गाजले आहे. चित्रपटगृहात हे गाणे लागल्यानंतर सगळ्यांनीच शिट्ट्या वगैरे मारल्या. त्यामुळे या मराठमोळ्याb अभिनेत्याचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अगदी छोटा सीन असला तरी या सीनमध्ये उपेंद्र लिमये भाव खाऊन गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची ही भूमिका सगळ्यांना खूप आवडलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘महापरिनिर्वाण’ दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
पहिल्या चित्रपटातून चमकले नशीब, लागले असे ग्रहण की, गेले 10 वर्ष एकही हिट सिनेमा नाही

हे देखील वाचा