×

उर्मिला कोठारेने आदिनाथला वाढदिवसाच्या दिल्या खास अंदाजात शुभेच्छा, पोस्ट पाहून ‘त्या’ चर्चांना मिळाला पूर्णविराम

मनोरंजनविश्वात नेहमीच आपण कलाकारांबद्दलच्या विविध बातम्या ऐकत असतो. कधी त्या बातम्या अफवा निघतात तर कधी त्या बातम्या खऱ्या असतात. मराठी इंडस्ट्रीदेखील याला अपवाद नाही. आता कलाकार म्हटले की, त्यांना अशा सर्वच गोष्टींची सवय असते. सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक सिनेमा तुफान गाजत आहे आणि तो सिनेमा म्हणजे अमृता खानविलकरचा ‘चंद्रमुखी’. तुफान गाजणाऱ्या या सिनेमाने खूपच लोकप्रियता मिळवली. चंद्रमुखी आणि दौलत यांची आगळीवेगळी प्रेमकहाणी सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे सिनेमा गाजत असतात, दुसरीकडे सिनेमातील मुख्य भूमिकेत असणारा आदिनाथ कोठारे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप गाजत आहे.

आदिनाथ कोठारे आणि त्याची पत्नी असलेल्या उर्मिला कोठारे यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर तुफान येत होत्या. मात्र या बातम्यांवर आदिनाथ किंवा उर्मिला यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आले नाही. या सर्व प्रकरणावर उर्मिलाची सोशल मीडियावरील एक पोस्ट सध्या खूपच सूचक ठरत आहे. नुकताच आदिनाथचा वाढदिवस साजरा झाला . यानिमित्ताने उर्मिलाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या बद्दल असलेले प्रेम आणि विश्वास तिच्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. उर्मिलाने त्या दोघांचा एक जुना फोटो शेअर केला असून, त्यावर एक सुंदर संदेश देखील लिहिला आहे.

उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि आदिनाथ पॅराग्लाइडिंग करताना दिसत असून, त्यावर तिने लिहिले, “आपण सोबत उडी मारली, सोबत भरारी घेतली आणि आपल्याला माहित होते. आपण पुन्हा एकत्र येऊ आणि तसेच झाले. जुन्या अविस्मरणीय आठवणींना एक उजाळा. आदिनाथ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात नेहमी अशीच भरारी घे आणि तुझ्या लक्षापेक्षाही जास्त यश कमव. माझी सोबत आणि माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.”

उर्मिलाच्या या पोस्टमुळे या दोघांमध्ये सर्वच सुरळीत असून, मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांना जिजा नावाची एक मुलगी असून त्यांचा १० वर्षांचा संसार उत्तम चालू आहे. सध्या उर्मिला तुझेच मी गीत गात आहे मालिकेत व्यस्त आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post