ख्रिसमसच्या खास क्षणी समोर आला वाणीचा हटके लूक, चाहते तर सोडाच कलाकारही करतायत कौतुक


ख्रिसमसच्या खास क्षणी अनेक कलाकार त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. कुणी घरी डेकोरेशन करत आहे, तर कुणी ख्रिसमस पार्टीचा आनंद घेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने देखील स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये वाणीने तिच्या खांद्यावर जॅकेट टाकून ब्रालेट दाखवली आणि लोकांना प्रश्न विचारले आहेत.

वाणी कपूरने (Vaani Kapoor) जे फोटो शेअर केले आहेत, त्याच्यामध्ये ती लाल रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर या जॅकेटला शोभेल अशी काळ्या रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाची ब्रालेट तिने घातली आहे. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. वाणीने मेकअप करत केस देखील मोकळे सोडले आहेत.

वाणीने हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारत लिहिले आहे की, “मेरी ख्रिसमसची तयारी खूप चांगली सुरू आहे… आणि तुमची?”

वाणीच्या या फोटोला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ५०० पेक्षाही अधिक कमेंट्सचाही पाऊस पडला आहे. चाहत्यांसोबतच कलाकारही तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नाने तिच्या या फोटोवर कमेंट करत “क्यूटी” असे लिहिले आहे.

वाणी आणि आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) या कलाकारांचा आगामी चित्रपट ‘चंदीगड करे आशिकी’हा १० डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. या चित्रपटाचे त्यांनी खूप प्रमोशन केले होते. या चित्रपटातील आयुष्यमान आणि वाणी यांच्या किसिंग सीनची देखील खूप चर्चा झाली होती.

वाणी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०१३ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर वाणीने ‘बेफिक्रे’, ‘बेलबॉटम’, ‘वॉर’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!