गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठी सीझन – ५ ला सुरुवात झाली. बिग बॉस च्या घरात काही ना काही ट्विस्ट येतच असतात. सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अरबाज व निक्की यांचा बाँड लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसतोय.
अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखी एक लव्हस्टोरी फुलताना दिसतीये. कालच्या भागात असे झाले की, वैभव चव्हाण इरिनाला म्हणतो, “कालपेक्षा आज जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं वाटतंय .”त्यावर इरिना ‘हो’ असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला म्हणते , “फॉरेनची पाटलीन मस्त आहे”.
त्यामुळे , वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की ही फक्त एक मज्जा आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहे.
तर, एकीकडे मात्र आर्या अस्वस्थ झाल्याचे दिसून आली. बिग बॉस चा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात आर्या ला अश्रू अनावर झालेले दिसत आहे. आर्या तिच्या भावनाबद्दल वैभवला सांगताना दिसत आहे. त्यावर तिला वैभव म्हणतो , “अरे, मी तुला कधीच वाटू दिले नाही.” त्यावर आर्या म्हणते की, पण मला तर वाटू शकतं ना …
त्यामुळे , याचे घरातील इतर सदस्यांवर काय परिणाम होतील, व खेळ कश्या पद्धतीने बदलेल हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे असणार आहे.
कालच्या भागात , नॉमिनेशन कार्य पार पाडलं. अंकिता वालावलकर कॅप्टन असल्याने घराबाहेर ती या आठवड्यात सेफ असणार आहे. पंढरीनाथ कांबळे , योगिता चव्हाण , निक्की तांबोळी , घनश्याम , निखिल दामले व सुरज हे या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट आहेत. यामुळे, या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल हे बघणे महत्वाचे असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
‘हिल, हिल पोरी हिला’ गाण्यावर निक्की आणि अरबाजने केला जबरदस्त डान्स
पॉलिटिक्स आहे रे सगळं! विनेश फोगटच्या बातमीवर अभिनेता समीर परांजपेची पोस्ट चर्चेत…