Monday, July 15, 2024

83 वर्षीय अभिनेता 29 वर्षीय प्रेयसीपासून घेणार घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

हॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते अल पचीनो सध्या चांगलाचं चर्चेत आले आहे. अल पचिनो आणि त्यांची गर्लफ्रेंड नूर यांना एकदा डिनर डेटसाठी एकत्र पाहिले गेले आणि नंतरच त्यांच्यात काहीतरी असल्याच्या आणि रिलेशनशिपच्या बातम्यांना ऊत आला होता. नूर केवळ 29 वर्षांची असून अल हे 83 वर्षांचे आहेत. त्यांच्यात तब्बल 54 वर्षांचे अंतर आहे. पण आता त्या दोघांच्या घटस्पोस्टाच्या बातम्या येत आहेत.

अल पचिनो (Al Pacino)आणि त्यांची गर्लफ्रेंड नूर यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. नूर अलफल्लाहने आपल्या मुलाच्या ताब्यासाठी अर्ज केला आहे. तिने लॉस एंजेलिसमध्ये कायदेशीर कागदपत्रे दाखल करून मुलाला ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तसेच ‘द गॉडफादर’ अभिनेत्याला ‘योग्य भेटीचा’ अधिकार मिळावा अशी तिची इच्छा आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, अलफल्लाहने यापूर्वी संयुक्त कायदेशीर कोठडीसाठी सहमती दर्शवली होती, कारण तिला तिच्या माजी प्रियकराने शिक्षण, वैद्यकीय उपचार, आर्थिक आणि धर्म यासारख्या बाबींशी संबंधित निर्णय घेण्यास मदत करावी अशी तिची इच्छा होती. तिच्या कायदेशीर फाइलिंगमध्ये, अल्फल्लाहने ‘पालकांची ऐच्छिक घोषणा’ नावाचा एक दस्तऐवज आहे, ज्यावर दोघांनी स्वाक्षरी केली होती. दोघेही गेल्या वर्षी एप्रिल 2022 पासून प्रेमसंबंधात होते.

त्यांनी आपल्या बाळाचे, रोमन अल्फाल्फा पचिनोचे फक्त तीन महिन्यांपूर्वी 6 जून रोजी स्वागत केले. अभिनेता आधीच दोन महिलांसह तीन मुलांचा बाप आहे. न्यायालयाच्या दस्तऐवजांमध्ये, अल्फाल्लाहने पचिनोने तिच्या वकिलाची फी किंवा केसशी संबंधित इतर कोणतेही खर्च भरावेत अशी विनंती केली आहे. अल यांचे आतापर्यंत हाय-प्रोफाइल रिलेशनशिप्स राहिलेत, पण त्यांनी कधीही लग्न केले नाही.

दरम्यान अल पचिनो यांच्याबद्दल बोलायचे झाल्ये तर, त्यांनी अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये कमालीच्या भन्नाट भूमिका केल्या आहेत. त्यांना त्यांच्या या चित्रपटांमुळे जागतिक ओळख मिळाली आहे. त्यांनी क्लासिक ‘द गॉडफ़ादर’ या सिरीजसोबतच ‘स्कारफेस’, ‘सेंट ऑफ़ ए वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ़ लव’, ‘द डेविल्स एडवोकेट’, ‘द इनसाइडर’, … ‘एंड जस्टिस फ़ॉर ऑल’, ‘कार्लिटोज़ वे’, ‘डॉनी ब्रास्को’, ‘ओशन्स थर्टीन’, आणि अजून अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये झळकले आहेत. (Veteran Hollywood actor Al Pacino will take a ghat spot from his girlfriend Noor Alfallah)

अधिक वाचा-
काय सांगता! अभिनेत्री समांथा रुथ प्रभू करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण
‘जवान’च्या ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीने नेटकऱ्यांना लावले वेड; बोल्ड बिकिनी फोटो झाले व्हायरल

हे देखील वाचा