विकी कौशलने केला नवीन हेअरकट; फोटो शेअर करत म्हणतो, ‘केस नका कापू…अरे’


आधुनिक काळात कलाकार आणि फॅन्स यांच्यातील संवादाचे मुख्य आणि महत्त्वाचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. आजच्या या सोशल मीडियाच्या काळात कलाकार फॅन्ससोबत याच माध्यमातून जोडलेले असतात. याच माध्यमातून कलाकार त्यांच्याबद्दल माहिती फॅन्ससोबत शेअर करत असतात. शिवाय सध्या या माध्यमामुळे कलाकारांच्या लोकप्रियतेचा देखील अंदाज घेता येतो.

हिंदी सिनेसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेता म्हणून विकी कौशल ओळखला जातो. विकीने अगदी कमी कालावधीमध्ये या क्षेत्रात त्याचे स्थान मिळवले आहे. शिवाय त्याची लोकप्रियता देखील कमालीची आहे. मागील काही काळापासून विकी त्याच्या व्यायसायिक आयुष्यापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मात्र, सध्या विकी चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याने त्याचा नवीन लूकमधील शेअर केलेला फोटो.

कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊनमुळे सर्व बंद होते. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी- कमी होत असल्याने हळूहळू राज्यसरकारने अनलॉक केले. त्यामुळे सर्वच शॉप, स्पा इतर आवश्यक गोष्टी सुरु झाल्याने अनेक दिवसांपासून घरात बसलेले कलाकार बाहेर पडत आहे. याला विकी कौशल देखील अपवाद नाही. बऱ्याच काळानंतर विकी सलूनमध्ये गेला आणि तिथून त्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. बऱ्याच दिवसांनी विकीने सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट केला आहे.

विकीने त्याचा हेअर कट करतानाच एक फोटो पोस्ट करत “केस नका कापू… अरे,” असे कॅप्शन दिले आहे. यावेळी विकीने मास्क घातला असून त्याचा लूक एकदम वेगळा वाटत आहे. हा हेअर कट, नवीन लूक आगामी सिनेमासाठी आहे का असा प्रश्न आता सर्वाना पडत आहे. विकीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर फॅन्सच्या भन्नाट कमेंट्सदेखील येत आहेत.

सध्या विकी आणि कॅटरिनाच्या अफेअरच्या चर्चा मीडियामध्ये गाजत आहेत. विकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो लवकरच सरदार उधम सिंगच्या बायोपिकमध्ये दिसणार असून, या सिनेमाचे शूटिंग त्याने पूर्ण केले आहे. शिवाय मेघना गुलजारच्या ‘सॅम माणिकशॉ’, ‘द इमॉर्टल अश्वत्थामा’ सिनेमातही तो मुख्य भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.