कॅटरिनाने बनवलेला हलवा खाऊन कामावर परतला विकी, फोटो शेअर करत म्हणाला…

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) ९ डिसेंबरला राजस्थान येथे लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर दोघांनीही त्यांच्या कामाला सुरूवात केली आहे. विकीने स्वत: सोशल मीडियावर स्वतःचा एक सेल्फी शेअर केला आहे. यात तो कारमधून कामावर जाताना दिसला. फोटो पाहून असे वाटते की, तो त्याच्या आगामी एका प्रोजेक्टच्या शूटिंगला जात आहे.

विकी कौशलने त्याचा सेल्फी शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘आधी कॉफी नंतर क्लिपबोर्ड’. त्याच्या कॅप्शनवरून असे दिसते की, तो त्याच्या आगामी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर जात होता. विकी अनेकदा कामामधून शूटिंगच्या लोकेशनपर्यंतचे सेल्फी आणि व्हिडिओ शेअर करतो. चित्रपटाच्या सेटवर जाताना तो बहुधा पंजाबी गाणी ऐकताना दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

कॅटरिनाने बनवलेल्या हलव्याचे केले कौतुक
विकी कौशलची पत्नी कॅटरिना कैफने घरी हलवा बनविला होता. विकीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत तो फोटो शेअर करत कॅटरिनाचे कौतुक केले आहे. त्याने या फोटोवर कॅप्शनमध्ये ‘बेस्ट हलवा एव्हर’ असे लिहिले आहे. कॅटरिना कैफ लग्नानंतर प्रत्येक विधी मनापासून करत आहे. हनीमूनवरून परतलेल्या कॅटरिनाने लग्नानंतरचा एक विधी पूर्ण केला आणि त्याची झलक शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कॅटरिना कैफने पहिल्यांदा तिच्या सासरच्या स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि हलवा बनवलेला आहे. कॅटरीनाने हलव्याने भरलेली वाटी असलेला फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले ‘मी बनवला’ तिने लग्नानंतरचा विधी पूर्ण केला तो म्हणजे सासरी स्वयंपाकघरात प्रवेश करताना काही तरी गोड बनवणे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एकत्र काम करणार विकी आणि कॅटरिना 
मिळालेल्या माहितीनुसार, विकी आणि कॅटरीना आता लग्नानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोघांनी एक हेल्थ प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी अप्रोच केले गेले आहे. लवकरच दोघे त्याची शूटिंग सुरू करणार आहेत. तसेच दोघे लक्झरी ब्रँडसाठी देखील एकत्रित दिसणार आहेत. आतापर्यंत हे दोघे फक्त पुरस्कार कार्यक्रम, फोटो, शोमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाचे केवळ फोटो समोर आले.

हेही वाचा-

Latest Post