Tuesday, March 5, 2024

मजा आहे बुवा! नयनताराला पतीने दिली तब्बल ‘इतक्या’ लाखांची आलिशान कार भेट, किंमत वाचून डोळेच फिरतील

साऊथ इंडस्ट्रीत अनेक मनमोहत सौंदर्याने परिपूर्ण आणि नावाजलेली अभिनेत्री म्हणजे नयनतारा. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात खास आहे. हे जोडपे बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले. 9 जून रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. नयनताराचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 मध्ये बंगळुरूमध्ये झाला. नयनतारा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नयनतारा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

जवान‘ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दक्षिणेतील सुंदर नयनताराने (Nayantara) या महिन्यात आपला वाढदिवस साजरा केला. 18 नोव्हेंबर रोजी अभिनेत्री 39 वर्षांची झाली. आता तिचा पती विघ्नेश शिवन याने पत्नीला वाढदिवसाची अप्रतिम भेट दिली आहे. पतीकडून अशी भेट मिळाल्याने नयनताराही आनंदी आहे. नयनताराच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त विघ्नेशने तिला एक आलिशान मर्सिडीज मेबॅक कार भेट दिली आहे.

या काळ्या रंगाच्या आलिशान कारची मूळ किंमत 2.69 कोटी रुपये आहे आणि टॉप एंड कारची किंमत 3.40 कोटी रुपये आहे. नयनताराने तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन ब्रँडच्या कारची झलक दाखवली आहे. नयनताराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्रँडचा लोगो दाखवत दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘वेलकम होम ब्युटी… @wikkiofficial माझे प्रिय पती, वाढदिवसाच्या सर्वात गोड भेटवस्तूसाठी धन्यवाद, तुझ्यावर माझ खूप प्रेम आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by N A Y A N T H A R A (@nayanthara)

 नयनतारा आणि विघ्नेशने या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे स्वागत केले. नयनताराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती आता ‘अन्नपूर्णानी – द देवी ऑफ फूड’ या तमिळ नाटकात दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. नवोदित नीलेश कृष्णाने याचे दिग्दर्शन केले आहे. यात जयही मुख्य भूमिकेत आहे. जय आणि नयनतारा 2013 मध्ये अॅटलीच्या राजा रानी या चित्रपटात एकत्र दिसले होते. (Vignesh Sivan gifted Mercedes car to Nayantara on her birthday)

आधिक वाचा-
ना काजोल… ना राणी मुखर्जी, ‘या’ अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत केले आहेत सर्वाधिक चित्रपट; एकदा वाचाच
खळबळजनक! आलिया भट्टनंतर क्रिती सेनॉनचाही ‘तसला’ व्हिडीओ व्हायरल; एकदा पाहाच

हे देखील वाचा