Sunday, June 4, 2023

Forensic | सुन्न करून टाकेल चित्रपटाची कथा, पाहा विक्रांत मेसीच्या ‘फॉरेंसिक’चा ट्रेलर

‘मिर्झापूर’चा ‘बबलू पंडित विक्रांत मेसी (Vikrant Massey) एकामागून एक एक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये सतत दिसत आहे. अशातच आता विक्रांत मेसीच्या ‘फॉरेंसिक’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत राधिका आपटेही (Radhika Apte) आपले अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा एक क्राईम थ्रिलर आहे. यामध्ये विक्रांत मेसी जॉनी नावाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञाची भूमिका साकारत आहे. तर राधिका आपटे एका इन्स्पेक्टरची भूमिका साकारत आहे.

‘फॉरेंसिक’ चित्रपटाचा ट्रेलर 2 मिनिटे १० सेकंदांचा आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. ‘फॉरेंसिक’ हा चित्रपट या महिन्यात, म्हणजेच २४ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. (vikrant massey and radhika aapte s film forensic trailer is out)

काय खास आहे ट्रेलरमध्ये?
हा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेल्या या ट्रेलरमध्ये पोलिस एका सीरियल क्रिमिनलचा शोध घेताना दिसत आहेत, जो त्यांच्या वाढदिवशी मुलांची हत्या करतो. यादरम्यान फॉरेंसिक तपासातून अनेक पुरावे समोर येत आहेत, मात्र तपासानंतरही या प्रकरणात ट्विस्ट आणि वळणे येत असल्याने, तपास तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.

तसेच राधिका आपटे आणि विक्रांत मेसीसोबत या चित्रपटात प्राची देसाईही (Prachi Desai) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्राची डॉ. रंजनाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा