Love Hostel | विक्रांत मेसीने निम्म्याहून कमी फीमध्ये केलं काम, अभिनेत्याने स्वत: सांगितले कारण

विक्रांत मेसी (Vikrant Massey) ‘लव्ह हॉस्टेल’ चित्रपटातील त्याच्या जबरदस्त अभिनयामुळे चर्चेत आहे. विक्रांत मेसीने चित्रपटातील त्याच्या आशूच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे. ‘लव्ह हॉस्टेल’मध्ये तो बॉबी देओल (Bobby Deol) आणि सान्या मल्होत्रासोबत (Sanya Malhotra) जबरदस्त अभिनय करताना दिसला आहे. अभिनयाची प्रशंसा झाल्यानंतर, या अभिनेत्याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे की, त्याने चित्रपटात काम करण्यासाठी निम्म्याहून कमी फी घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

विक्रांत मेसीने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘लव्ह हॉस्टेल’ हा त्याच्या करिअरमधील एकमेव चित्रपट आहे, ज्यामध्ये त्याला निम्म्याहून कमी फी मिळाली आहे. अभिनेत्याने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “हा चित्रपट एका ठराविक बजेटमध्ये बनवायचा होता. निर्माते सुरुवातीला खूप खर्च करतात हे प्राधान्य नाही, अशा परिस्थितीत फी देखील कमी करावी लागेल, हे तुम्हाला समजून जाते.” विक्रांत पुढे म्हणाला की, “तुम्हीही ते स्वीकार करता, कारण तुम्हाला चित्रपटाबद्दल मनापासून भावना आहे.” (vikrant massey charged less than half of his fees for love hostel bobby deol sanya malhotra web series)

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

विक्रांत मेसीने मुलाखतीत सांगितले की, त्याच्या टीमला कमी फी घेण्याच्या निर्णयाने थोडं आश्चर्य वाटलं कारण निम्मी फीही मिळत नव्हती. अभिनेता म्हणाला, “तुम्ही जेव्हा चित्रपट साइन करता तेव्हा तुमच्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो. परंतु तो प्रेरक घटक नाही.” अभिनेता पुढे म्हणतो की, “पैसा खूप महत्वाचा आहे, कारण तुम्ही काम करत आहात… ही एक सामान्य गोष्ट आहे पण कधी कधी तुम्हाला फी देखील कापावी लागते.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post