‘ही तर फक्त सुरुवात आहे!’, म्हणत ‘टायगर ३’च्या शूटिंगपूर्वी इमरान हाश्मीने दाखवली जबरदस्त बॉडी


कलाकार नेहमीच आपल्या विविध पोस्टमुळे चर्चेचा विषय बनत असतात. कधी ते आपल्या नवीन गाडीसोबतचा, कधी जिममधील, कधी पत्नीसोबतचा, तर कधी गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करतात. यामुळे ते चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. असाच आता बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीही चर्चेत आला आहे. यावेळी तो एका हटके कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण आहे त्याचा शर्टलेस फोटो होय. त्याचा हा फोटो नुसता धुमाकूळ घालत आहे.

इमरान हाश्मीने शनिवारी (१० जुलै) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक फोटो शेअर केला आहे. त्याने आपला एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याचे गजब ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. सोबतच आपले ऍब्ज फ्लॉन्ट करत आहे. त्याचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोत त्याने जॉगर्स, हेडबँड आणि मास्क परिधान केल्याचे दिसत आहे. (Viral Social Ahead of The Shooting of Tiger 3 Emraan Hashmi Show off His Stong Body Shares Shirtless Photo)

इमरान हा सलमान खानच्या ब्लॉकबस्टर ‘टायगर’ या फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी पूर्णपणे तयार आहे. तो चित्रपटात एका खलनायकाची भूमिका साकारत आहे. इमरान आपल्या पात्रामध्ये फिट बसण्यासाठी या ट्रान्सफॉर्मेशनमधून जात आहे. अभिनेत्याने आपले ऍब्ज फ्लॉन्ट करत हा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ही तर फक्त सुरुवात आहे!!!”

इमरानच्या या फोटोला आतापर्यंत ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याच्या या फोटोतून स्पष्ट होत आहे की, तो आपल्या आगामी चित्रपटासाठी किती मेहनत घेत आहे. त्याने आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने लोकांना चकित केले आहे.

इमरानचे चाहते कमेंट करून त्याची जोरदार प्रशंसा करत आहेत. कबीर खान दिग्दर्शित ‘टायगर’ फ्रँचायझीचा पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ हा होता. हा चित्रपट सन २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर सन २०१७ मध्ये ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर आता तिसऱ्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष शर्माच्या खांद्यावर आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सलमान खआन आणि कॅटरिना कैफ २३ जुलैपासून मुंबईत ‘टायगर ३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.