हरियाणवी गायक अरविंद जांगिड यांची गाणी बर्याचदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अरविंद जांगिड जी गाणी आणतात, ती यूट्यूबवर ट्रेंड होतात. आताही ते एक नवीन गाणं घेऊन आले आहेत. जे चाहत्यांकडून खूप पसंत केलं जात आहे. अरविंद जांगिड यांच्या नव्या हरियाणवी गाण्याचं शीर्षक आहे ‘गर्लफ्रेंड’!
अरविंद जांगिड यांनी गायलेले हे गाणे खूप लोकप्रिय होत आहे. हे गाणे रिलीज होताच व्हायरल झाले आहे आणि सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हे गाणं रिलीज होऊन आठवडा उलटला असला तरी यूट्यूबवर त्याला ५४ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
यूट्यूबवर धुमाकुळ घालणाऱ्या या हरियाणवी गाण्याचे बोल ‘धीरे धीरे बढ़ी नजदीकियां, धीरे-धीरे फ्रेंड गर्लफ्रेंड हो गई…’ या गाण्यामध्ये अजय हूडा आणि अंजली राघवची जोडी आहे. अजय हूडा यांनी हे गाणं लिहिलं आहे, तर त्याचं संगीत आणि गायन अरविंद जांगिड यांनी केलं आहे. गाण्यात अजय हूडा आणि अंजली राघव यांची जोडी चांगलीच गाजली आहे. दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांमध्ये एक रोमँटिक मूड निर्माण करत आहे.
अरविंद जांगिड यांचं हे गाणं २०२० च्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालं होतं. हे गाणे गामापा नावाच्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड केलं गेलं आहे. जे आता ट्रेंड होत आहे.
असो, अजय हूडा आणि अरविंद जांगिड ही हरियाणवी संगीत इंडस्ट्रीमधील नावं आहेत. अशा परिस्थितीत त्यांचं नवीन गाणं येताच ते व्हायरल होणं हे स्वाभाविक आहे. असंच काहीसं अलीकडे प्रदर्शित झालेल्या या गाण्याच्या यशाद्वारे पाहायला मिळत आहे.