क्या बात है! मिलिंद सोमण यांनी शेअर केला ३० वर्ष जुना फोटो, पत्नी अंकिता कुंवरची खास कमेंट


बॉलिवूडमध्ये फिटनेससाठी प्रसिद्ध असलेले मिलिंद सोमण यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग ते अभिनेता असा त्यांचा सुंदर प्रवास आजवर आपण बघितला आहे. मिलिंद सोमण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या मॉडेलिंगच्या दिवसांचे फोटो, आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी १९९१ मधील फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला आहे, जे पाहून हा फोटो ३० वर्ष जुने आहे, हे सांगणे सोपे नाही. या फोटोत मिलिंद खूपच सुंदर दिसत आहेत. काश्मिरी टेक्सटाईलसाठी हे शूट करण्यात आले होते. त्यांच्या या फोटोवर त्यांच्या चाहत्यांसह पत्नीनेही खास कमेंट केली आहे.

मिलिंद सोमण यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ३० वर्ष जुना आहे. जेव्हा ते मॉडेलिंग करायचे, या फोटोत ते खूपच तरुण दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, मिलिंद यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘थ्रोबॅक थर्सडे (गुरुवार), १९९१, खरोखर सुंदर जुने काश्मिरी वस्त्र, काळ्या रंगाची शॉर्ट्स, दिल्ली उष्णता, भरत सिक्का, आणि मी.’

यावर मिलिंद सोमण यांचे चाहते, खूप प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर, पत्नी अंकिता कुंवर स्वत: ला बोलण्यापासून रोखू शकली नाही. तिने लिहिले, ‘यम्म’ असे किस करत, तिने इमोजी पोस्ट केले आहेत.

एका चाहत्याने लिहिले, “केसांचा रंग वगळता, काहीही बदलले नाही, आपण कधीही म्हातारे होणार नाही.” दुसर्‍या फॅनने लिहिले की, ‘वाह सर, देखणे दिसत आहात.’ एका चाहत्याने लिहिले, ‘विलक्षण, खूप छान, जिंदाबाद’.

कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर, त्यांनी चाहत्यांनी केलेले प्रेम, आणि त्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी सगळ्यांना धन्यवाद म्हटले आहे. मिलिंद यांनी पूर्ण बरे होण्यासाठी, कोण कोणते घरगुती उपचार घेत आहेत हे सांगितले आहे. त्यांनी चाहत्यांसह काढ्याची रेसिपीही शेअर केली आहे. यासह मिलिंद सोमण यांनी, आपल्या चाहत्यांना प्लाझ्मा दान करून इतरांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मिलिंद सोमण आज ५५ वर्षांचे असले, तरीही पण ते खूप तंदुरुस्त दिसतात. ते आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम करताना दिसत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.