बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या ‘इंडियन आयडल १२’ मध्ये जजच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय आदित्य नारायणही या शोमध्ये होस्टची भूमिका साकारत आहे. आदित्य आणि नेहाची जुगलबंदी आता ‘इंडियन आयडल १२’ मध्येही पसंत केली जात आहे. नुकताच समोर आलेला त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये आदित्य नारायण आणि नेहा ‘दिलबर’ गाण्यावर नाचत आहेत. दोघेही मस्त मग्न होऊन नाचत असतात. मग नेहा आदित्यच्या दिशेने वळते आणि त्याच्याकडे जाऊ लागते, तेव्हा अचानक तिचा पाय मुरगळतो आणि ती खाली पडली. आदित्य तिला सावरू शकत नाही. हे बघून प्रेक्षक आणि इतर जज जोरात हसू लागतात. हा मजेदार व्हिडिओ आता इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.
.@VishalDadlani and @iAmNehaKakkar set the stage on fire! Watch #IndianIdol #DeshKiAwaaz, this weekend at 8 PM #IndianIdol11 @The_AnuMalik pic.twitter.com/3gWt6hLbiX
— sonytv (@SonyTV) November 8, 2019
नेहा कक्कर गेल्या ३ सिझनपासून ‘इंडियन आयडल’ला जज करत आहे. आता ती प्रेक्षकांची आवडती जज बनली आहे. त्याचबरोबर आदित्य नारायणही गेले २-३ सिझनपासून हा शो होस्ट करत आहे. अलीकडेच तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ज्यामुळे वीकेंडच्या एपिसोडसाठी त्याची जागा जय भानुशाली आणि त्यानंतर अभिनेता ऋत्विक धनजानी यांनी घेतली होती.
अलीकडेच नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये नेहा कक्करसह त्यांचे संपूर्ण कुटुंब वेड्यासारखे नाचताना दिसले. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे. यात सर्वजण टोनी कक्करच्या ‘तेरा सूट’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळाले. हे गाणे अली गोनी आणि जॅस्मीन भसीनवर चित्रित करण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा
-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ
-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश