खऱ्या आयुष्यात सासू बनल्या स्मृती इराणी, ‘तुलसी’ने सर्वांसमोर दिली जावयाला चेतावणी


टेलिव्हिजनवरून राजकारणाचा प्रवास सुरू करणाऱ्या अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना तुम्ही टीव्हीवर सासू-सुनेच्या अवतारात पाहले असेल. आधी त्या ‘तुलसी’ बनून पडद्यावरच्या आदर्श सून बनल्या आणि नंतर सासूच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना ही ओळख एकता कपूरच्या शो ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मधील अभिनयाने दिली. ज्यामुळे आजही चाहते घराघरात त्या मालिकेची चर्चा करतात. वर्षांपूर्वी टीव्हीवर सासू बनलेल्या स्मृती आता रियलमध्ये सासू बनल्या आहेत. नुकताच त्यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे.

स्मृती इराणी यांनी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत केली शेअर
स्मृती इराणी बनल्या सासू? हा प्रश्न तुमच्याही मनात घोळत असेल, तर जाणून घ्या ही बातमी अगदी खरी आहे. स्मृती यांची सावत्र मुलगी शानेल इराणीने तिचा प्रियकर अर्जुन भल्लासोबत लग्न करून तिच्या नात्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या खास सोहळ्याचे फोटो शेअर करून स्मृती यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

जावयाला दाखवला सासूचा अवतार
स्मृती यांनी दोघांचा अंगठी एक्सचेंज करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंद्वारे त्यांनी एका कॅप्शनमध्ये सासूचा अवतार दाखवत नव्या जावयाची शाळा घेतली आहे. या पोस्टमध्ये स्मृती यांनी अर्जुनला केवळ स्वत: पासूनच नाहीतर त्यांचे पती जुबिन इराणीपासून यांच्यापासूनही जपून राहण्याचा सल्ला दिला आहे.

लग्नाआधी जावयाला मिळाली अधिकृत चेतावणी
स्मृती यांनी लिहिले की, “अर्जुन भल्लाकडे आता आमचे हृदय आहे, या वेड्या कुटुंबात स्वागत आहे. सासऱ्याच्या रूपात एका वेड्या व्यक्तीचा सामना करण्यासाठी आणि त्याहीपेक्षा वाईट सासूचा म्हणजेच माझा सामना करण्यासाठी तुला आशीर्वाद शेनेल इराणी खुश राहा.”

चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव
स्मृती यांच्या या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एकता कपूर, मोनी रॉय यांच्यासह अनेक टीव्ही कलाकार सासू झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहेत.

स्मृती इराणी आहेत तीन मुलांची आई
स्मृती इराणी यांनी १९९९ मध्ये टीव्ही सीरियल ‘आतिश’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मधील ‘तुलसी’च्या मुख्य भूमिकेतून त्यांना जगभरात खरी ओळख मिळाली. जोहर आणि जोश ही स्मृती आणि पती झुबिन इराणी यांची मुले आहेत. जबती शनेल ही झुबिन इराणी यांची त्यांच्या पहिल्या लग्नाची पत्नी मोना इराणी यांची मुलगी आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!