‘माझ्या देशाला ऑक्सिजनची गरज आहे’, म्हणत सोनू सूदने हात जोडून केले विनंती

viral social sonu sood called with folded hands my country needs oxygen


कोरोना विषाणूची दुसरी लाट देशावर कहर बनून पसरत आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेमध्ये, स्थलांतरित कामगार जेव्हा समाज आणि प्रशासनावर निराश झाले होते, तेव्हा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद त्यांच्यासाठी मसीहा बनला होता. त्या दिवसापासून आतापर्यंत सोनू गरजू लोकांना सतत मदत करत आहे. यासाठी त्याने अगोदर सूद फाउंडेशन तयार केले आणि नंतर एक अ‍ॅप लाँच केले.

दररोज सोनू सूदचे अधिकृत ट्विटर अकाऊंट, मदत मागणाऱ्या ट्विट्सने ओसंडून वाहत असते. दररोज तो मोठ्या संख्येने लोकांना मदत करतो आणि तो ट्विटरवर युजर्सला प्रत्युत्तर देखील देतो. सोमवारी (३मे) झाशी येथील एका व्यक्तीला आपत्कालीन आरोग्य सहाय्य यंत्रणेची गरज होती, त्यामुळे सोनू सूद त्या व्यक्तीला एअरलिफ्टने हैदराबादला घेऊन गेला. सोनूने त्यासंदर्भातील एक फोटोही रिट्विट केला आहे.

या व्यतिरिक्त त्याने अनेक संक्रमितांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्याने ट्वीट केले, “माय कंट्री नीड ऑक्सिजन.” म्हणजेच माझ्या देशाला ऑक्सिजनची गरज आहे, असे म्हणत त्याने जोडलेले हात आणि तिरंगाही बनविला आहे.

यानंतरच्या दुसर्‍या ट्विटमध्ये सोनूने लिहिले, “फक्त आणि फक्त ऑक्सिजन.”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनू सूद म्हणाला की, ऑक्सिजनच्या अभावामुळे काहीवेळा परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते. या मुलाखतीत बोलताना सोनू सूद खूप भावुक झाला. तो म्हणाला, “मला वाटते की जेव्हा कोणी आपल्या प्रियजनांसाठी ऑक्सिजन आणि बेड्स उपलब्ध करू शकत नसेल, तेव्हा त्यांना किती असहाय्य वाटत असेल.”

सोनू सूदने शनिवारी २५ एप्रिल रोजी, एक टेलिग्राम अ‍ॅप लाँच केले आहे. ज्याद्वारे तो देशभरातील गरजू लोकांना रुग्णालयात बेड, औषधे आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देईल. शनिवारी त्याने ट्वीट करून, देशवासियांना सोनू सूद कोव्हिड फोर्समध्ये जाण्याचे आवाहन केले. त्याने लिहिले, “आता संपूर्ण देश एकत्र येईल. मला टेलिग्राम चॅनेलवर सामील व्हा. ‘इंडिया फाइट्स विथ कोविड’ वर हात मिळवू…देशाला वाचवू.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

-‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.