एकदम झक्कास! सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी’ गाण्यावर ३ मुलींनी केला अफलातून डान्स; तुमचेही थिरकतील पाय


बॉलिवूडमधील नवीन- जुन्या गाण्यांवरील अनेक व्हिडिओ आपल्याला आता सोशल मीडियावर व्हायरल होताना हमखास पाहायला मिळतात. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सुष्मिता सेनच्या सन १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी नंबर १’ चित्रपटातील एका गाण्याचाही समावेश झाला आहे. सलमानच्या या चित्रपटातील ‘चुनरी चुनरी’ हे गाणे आजही प्रेक्षकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्याची क्रेझ मुलींमध्ये इतकी जास्त पाहायला मिळते की, अनेकांनी या गाण्यावर डान्स करून आपला व्हिडिओ यूट्यूबवरही अपलोड केला आहे.

अशातच जय माँ भवानी या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओने अवघ्या इंटरनेटचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओत ३ मुली सलमान खानच्या ‘चुनरी चुनरी’ या गाण्यावर अफलातून डान्स करताना दिसत आहेत. तिन्ही मुलींच्या स्टेप्स पाहण्यालायक आहेत. (Viral Video Watch The Dance of These 3 Girls On The Song Chunari Chunari)

त्यामुळेच मागील वर्षी जानेवारीत यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ४८ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. खरंतर या तिन्ही मुलींनी या गाण्यावर बेली डान्स केला आहे.

या गाण्यात सुष्मिता सेनच्या हटके अदांवर प्रेक्षक आधीपासूनच फिदा होते. अशातच या गाण्यावरील बेली डान्स पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर केव्हा आणि कसे कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा कोणालाही नेम नाही. कारण, या सर्व गोष्टी इंटरनेट युजर्सच्या हातात असतात. त्यांना जे आवडते, ते व्हायरल होण्यास थोडादेखील उशीर लागत नाही. सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जे प्रतिभावान व्यक्तींना कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. इथे लोक आपल्यातील कला, प्रतिभा जगासमोर दाखवू शकतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जस्टिन बिबरचे चालते फिरते घर पाहिले का? दिग्गज कलाकारांच्या बंगल्यालाही टक्कर देईल त्याची आलिशान बस

-‘असं चोरी करणं बरोबर दिसतं का?’ शालूच्या लेटेस्ट व्हिडिओवर युजरची लक्षवेधी कमेंट आली चर्चेत

-‘यू आर परफेक्ट’ गाण्यावर रुबीना दिलैकने लावले जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले इम्प्रेस


Leave A Reply

Your email address will not be published.