अनुष्काची ओढणी ओढताना दिसला विराट; लग्नाआधीचा न पाहिलेला फोटो होतोय जोरदार व्हायरल


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे एक रोमँटिक जोडपे आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्या दोघांची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. अशातच त्यांचे चाहते त्यांचे काही जूने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. विराट आणि अनुष्काच्या फॅन पेजवर त्यांच्या लग्नाच्या आधीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. (Virat and Anushka Sharma’s throw back photo viral on fan page)

हे फोटो जहीर खानच्या रिसेप्शनमधील आहेत. यात विराट कोहली मस्ती करताना दिसत आहे. तसेच तो अनुष्काची ओढणी ओढून डान्स करताना दिसत आहे.

विरुष्का डेस्टिनी या फॅन पेजवर विराट आणि अनुष्काचे कधीही न पाहिलेले फोटो समोर आले आहेत. जहीर आणि सागरिकाच्या रिसेप्शनवरील हा ब्लॅक एँड व्हाईट फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यावर एक लेटेस्ट फोटो देखील आहे, ज्यामध्ये अनुष्का तिची मुलगी वामिकाला घेऊन फिरायला निघाली आहे.

विराट आणि अनुष्का या वर्षी जानेवारी महिन्यात आई-बाबा झाले आहेत. त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. त्यांच्या मुलीचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले आहे. परंतु अजूनही त्यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा सोशल मीडियावर कोणाला दाखवला नाही. त्यांचे चाहते त्यांच्या मुलीला बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

मागील काही दिवसांपासून अनुष्का खूप चर्चेत आहे. तिने पर्यावरणाला पूरक असा एक निर्णय घेतला आहे. तिने तिच्या प्रेग्नेंसीमधील कपडे ऑनलाईन विकण्याचा निर्णय घेतला आहे. यात तिने 200 वर्षे पाणी वाचू शकते, असे सांगितले आहे. तसेच तिने ही गोष्ट पर्यावरणाला कशी लाभदायक आहे हेदेखील सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.