×

रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित अशा ‘इंडियन पुलिस एयरफोर्स’मध्ये विवेक ओबेरॉयची झाली ग्रँड एन्ट्री

बॉलिवूडमध्ये आपल्या हिट चित्रपटांसाठी आणि दमदार ऍक्शनसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टी. रोहित नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये जबरदस्त आणि धमाकेदार ऍक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीने आतापर्यंत कॉमेडी, ड्रामा, रोमँटिक आणि ऍक्शन चित्रपटांमध्ये अमाप यश मिळवले आता तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसिरीजच्या माध्यमातून तो ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यास सज्ज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांची भूमिका असणाऱ्या या सिरीजमध्ये अजून एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आता रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल खुद्द रोहित शेट्टी आणि विवेक ओबेरॉयनेच माहिती दिली आहे. दोघांनीही सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “भेट आमच्या स्क्वॉयडच्या सर्वात सिनियर ऑफिसरला. स्वागत आहे विवेक.” यासोबतच त्याने विवेकचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे, ज्यात विवेकने खाकी वर्दी आणि त्यावर बुलेट प्रूफ जॅकेट घातले असून, हातात गन आणि डोळ्यावर गॉगल घातला असून त्यात तो खूपच डॅशिंग दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

विवेकने रोहितच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले, “धन्यवाद भावा, प्रत्येक क्षणावर प्रेम करत आहे.माझ्या २० वर्षात मी या पातळीवर ना कोणता ऍक्शन सिनेमा केला नाही पहिला. तू मास्टर आहेस.” तत्पूर्वी रोहित शेट्टीच्या या ‘इंडियन पुलिस एयरफोर्स’ याबद्दल अधिक माहिती मिळाली नसली तरी यात सिद्धार्थ मल्होत्रा कबीर नावाचे पात्र निभावणार आहे. ही सिरीज अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित केली जाईल. सध्या याचे शूटिंग चालू असून, यावर्षी ही प्रदसरहित होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

रोहित शेट्टीने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अजय देवगन, रणवीर सिंग, अक्षय कुमार यांच्यासोबत सिंघम फिल्म्स, सिम्बा आणि सूर्यवंशी हे हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय शाहरुख खानसोबतचा त्याचा दिलवाले सिनेमा देखील गाजला.

हेही वाचा-

Latest Post