आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्रींनी लुटला सुट्ट्यांचा आनंद, पाहा अंदमान निकोबारमधील त्यांचे भन्नाट फोटो


आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अशा अनेक अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो तो म्हणजे एव्हरग्रीन आशा पारेख, वहीदा रहमान, आणि हेलन. यांनी आपल्या उत्तम अभिनयाने आपला एक मोठा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. या अभिनेत्रींची प्रसिद्धी अजूनही तेवढीच आहे. आपण त्यांच्या अलीकडील फोटोंवरून, याचा अंदाज घेऊ शकतो. या तीन सौंदर्यवतींची जोडी खूपच छान दिसत आहे. या तिघीही अंदमान निकोबारमध्ये सुट्टीचा आनंद लुटताना दिसल्या आहेत. आता त्यांच्या फोटोंची चर्चा सर्वत्र होत आहे.

असे म्हटले जाते की, आनंद साजरा करण्यासाठी वयाची किंवा वेळेची गरज असते. बॉलिवूडच्या या तीन ज्येष्ठ अभिनेत्रींचे फोटो पाहिल्यास तुमचे हृदयही सकारात्मकतेने भरून जाईल हे नक्की. या वयातली त्यांची असलेली अधीरता, आणि जीवन जगण्याची इच्छा चाहत्यांना प्रेरित करते आहे. म्हणूनच हल्ली या अभिनेत्री, सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहेत.

चित्रपट निर्माते तनुज गर्ग यांनी, त्यांच्या इंस्टाग्रामवर वहीदा रहमान, आशा पारेख, आणि हेलन यांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, ‘पहिला फोटो १०.०५.२१ चा. जर दिल चाहता है चित्रपट दिग्गज कलाकारांसमवेत पुन्हा बनविला, तर त्या चित्रपटात या तिन्ही ज्येष्ठ अभिनेत्री, वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलन असतील.’

निर्मात्यांनी पुढे लिहिले की, ‘अभिनेत्री अंदमानमध्ये आपल्या निवृत्तीच्या वर्षांचा आनंद घेत आहेत. आनंदाने भरलेल्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य घेत. शेवटी जेव्हा आपण म्हातारे होतो, तेव्हा आठवणी, प्रेम आणि काही चांगल्या मित्रांसह आपण परत तरुण होतो.’

प्रत्येकजण त्यांचे फोटो पाहून आनंदी आहे. यावर बॉलिवूड कलाकारहही भरपूर  प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने प्रेमाच्या तीन ईमोजी पोस्ट केल्या आहेत. दुसरीकडे अभिनेत्री सोफी चौधरीने कमेंट केली की, ‘मी यांना बघून त्यांच्या प्रेमात पडले आहे.’ त्याचवेळी दिव्या दत्ताने कमेंट करत म्हटले की, ‘मी त्यांच्या प्रेमात पडले आहे.’ हुमैमा मलिकसह अनेक कलाकार त्यांच्या फोटोवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही जेष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण

-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये भाग घ्यायचाय? पाहा कशाप्रकारे पोहचू शकता यावर्षीच्या हॉटसीटपर्यंत!


Leave A Reply

Your email address will not be published.