या ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये तुमच्या जोडीदारासोबत पाहा ‘हे’ रोमँटिक मराठी सिनेमे आणि साजरा करा व्हॅलेंटाईन डे


सध्या ‘व्हॅलेंटाईन’ आठवडा सुरू आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या सात दिवस आधीपासूनच हा आठवडा सुरू होतो. रोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे असे सात डे रोज साजरे केले जातात. या आठवड्यांत अनेक प्रेमी जोडपे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. त्यासाठी ते फिरायला जातात, जेवायला जातात, चित्रपट पाहायला जातात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बंद असलेले सिनेमागृह चालू झाले असले, तरी पाहिजे तसे सिनेमे अजून प्रदर्शित होत नाहीयेत. त्यासाठी आम्ही आज आमच्या या लेखातून तुम्हाला काही मराठी रोमँटिक सिनेमे सांगणार आहोत, जे तुम्ही घरी बसून तुमच्या जोडीदारासोबत पाहू शकता.

सैराट
सन २०१६ साली आलेल्या या सिनेमाने इतिहास रचला होता. सिनेमाच्या संवादांपासून, कलाकार, गाणी, संगीत सर्वच अप्रतिम होते. आजही या सिनेमाला, सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जवळपास सर्वच कलाकार पहिल्यांदाच काम करत होते. मासेमारी करणाऱ्या घरातला मुलगा आणि राजकीय नेत्याची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध तयार होतात. मात्र, तोलामोलाचे घर नसल्याने त्यांच्या प्रेमाला प्रचंड विरोध होतो. अनेक विरोधांचा सामना करून ते त्यांचे प्रेम तर मिळवतात. मात्र, या सिनेमाचा अंत खूपच धक्कादायक आहे. या चित्रपटाने रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची आणि आकाश ठोसर म्हणजे परशा या दोन नवीन कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या सिनेमाचे इतर अनेक भाषांमध्ये रिमेक देखील तयार झाले होते.

शाळा
सुजय डहाके दिग्दर्शित २०११ साली आलेला ‘शाळा’ हा सिनेमा प्रचंड गाजला. वयात येणाऱ्या मुलांमधील उमलणारे प्रेम या सिनेमात अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. नववीमध्ये शिकणारा अंशुमन जोशी हा मुलगा त्याच्याच वर्गातल्या शिरोडकर नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्यासमोर तो त्याच्या भावना व्यक्त करतो, पुढे त्यांचे काय होते हे सिनेमा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. या सिनेमाला दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

प्रेमाची गोष्ट
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’ हा सिनेमा २०१३ साली प्रदर्शित झाला. या सिनेमात २ जोडप्यांच्या दोन कथा दाखवण्यात आल्या आहेत. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात हे दोघे त्यांच्या जोडीदारापासून वेगळे राहत असतात. एका वळणावर त्यांची भेट होते आणि त्यांना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होते. मात्र, आपला आधीच पार्टनर आणि आता आपले नवीन प्रेम कसे व्यक्त करावे या प्रश्नांमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण होते. अतिशय सुंदर आणि प्रेमाला उत्तम अर्थ देणारा हा सिनेमा सुपरहिट झाला होता.

मुंबई पुणे मुंबई
सन २०१० साली आलेला सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमाचे २ भाग देखील आले आहेत. एक मुंबईची मुलगी पुण्याला तिच्या लग्नासाठी आलेल्या मुलाला भेटायला येते. पुण्यात तिला एक नवीन मुलगा भेटतो हे दोघे एक संपूर्ण दिवस पुण्यात फिरून घालवतात आणि शेवट त्यांना एक नवीन सत्य समजते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा प्रचंड गाजला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.