×

अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला अखेरच्या काळात सहन करावा लागला मोठा मनस्ताप

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांमुळे तर प्रत्येकाच्या आठणतीत राहिल्याच त्यासोबतच त्या त्यांच्या खासगी आयुष्यातील संघर्षामुळेही विशेष ओळखल्या जातात. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री साधना यांच्या नावाचा समावेश होतो. अभिनेत्री साधना (Sadhana) त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या चित्रपटांची आणि अभिनयाची अनेकदा चर्चा होत असते. १९६०-७० च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले  होते. पाहूया साधना यांचा न वाचलेला जीवनप्रवास.

साधना यांचा जन्म 1941 मध्ये पाकिस्तानातील कराची येथे एका सिंधी कुटुंबात झाला होता. साधना 60 च्या दशकात बॉलिवूडमध्ये सक्रिय होत्या. यांनी 1960 मध्ये ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटातील साधना पाहून प्रेक्षकांना त्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साधना त्यांच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यांच्या 1966 मध्ये आलेल्या ‘मेरा साया’ या चित्रपटात त्यांच्यावर ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’ हे गाणे चित्रित करण्यात आले होते, जे आजपर्यंत प्रसिद्ध आहे.

 

साधना यांचा चित्रपट प्रवास जितका मोठा होता तितकाच शेवटचा काळही दुःखात गेला होता. साधना यांनी चित्रपट निर्माते आर. के नय्यर यांच्याशी विवाह केला. ‘लव्ह इन शिमला’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अय्यर आणि साधना एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जाते. या दोघांचे लग्न 30 वर्षे टिकले, मात्र त्यानंतर साधनांचा वाईट काळ सुरू झाला. खरे तर आर के नय्यर यांचे लग्नाच्या ३० वर्षानंतर निधन झाले. पतीच्या निधनानंतर साधना यांना मूलबाळ नसल्याने एकट्या पडल्या. साधना ज्या घरात राहायच्या त्या घरावरही खटला सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत, आजारी असूनही साधना यांना सतत कोर्ट आणि पोलिसांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, हा त्यांच्यासाठी खूप वाईट अनुभव होता. मात्र, या सर्व संघर्षांशी लढत साधना यांनी 25 डिसेंबर 2015 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. त्या काळात त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक चांगलेच प्रतिसाद देत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post