‘आम्ही तुझ्या मुलाचे मामा कधी होणार?’, फोटोग्राफरने विचारलेल्या प्रश्नावर भारतीचे मजेशीर अंदाजात उत्तर

टेलिव्हिजनची सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग अनेकदा चर्चेचा विषय बनत असते. यासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आजकाल ती ‘डान्स दीवाने’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसत आहे. अलीकडेच भारतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला इंटरनेटवर प्रचंड पसंती मिळत आहे.

अलीकडेच पॅपराजीने भारतीला आई होण्याबद्दल प्रश्न विचारला, ज्याला तिने अतिशय मजेदार पद्धतीने उत्तर दिलं. यानंतर, भारतीच्या उत्तराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतीने केले शो पाहण्याचे आवाहन
भारती ‘डान्स दीवाने’चे शूटिंग पूर्ण करून तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये पोहोचली होती. यादरम्यान तेथे उपस्थित असलेले पॅपराजी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढायला लागले. यावर भारती म्हणाली, “डान्स दिवाने आणि कपिल शर्मा शो बघत राहा. त्यानंतर ती म्हणाली की, कधी पाहायचे आहे? तर रात्री ८ ते ९:३० पर्यंत डान्स दीवाने आणि त्यानंतर लगेच कपिल शर्मा शो लावायचा.”

फोटोग्राफर्सने विचारला प्रश्न
दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या काही फोटोग्राफर्सने तिला विचारले, “आम्ही तुझ्या मुलाचे मामा कधी होणार?” यावर भारती म्हणाली की, “यार, आता प्रत्येकजण मुलाची वाट पाहत आहे. फक्त तुम्ही लोक एकटे सोडा, त्यानंतर करूया.” तेथे उपस्थित असलेले प्रत्येकजण भारतीच्या या मजेशीर उत्तरावर हसायला लागले.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

भारतीचे २०१७ मध्ये झाले लग्न
भारती सिंगने सन २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. लग्नापूर्वी भारती आणि हर्ष जवळपास ७ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. हर्ष आणि भारती यांची पहिली भेट ‘कॉमेडी सर्कस’ या रियॅलिटी शोदरम्यान झाली होती. या दरम्यान, दोघे प्रथम मित्र बनले आणि नंतर लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. भारती शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाली होती, तर हर्ष शोचा स्क्रिप्ट रायटर होता.

भारती-हर्ष रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने’ होस्ट करणार
आजकाल भारती पती हर्ष लिंबाचियासोबत डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने’ होस्ट करत आहे. माधुरी दीक्षित या शोमध्ये जज आहे. शोचा पहिला होस्ट राघव जुयाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरच भारती आणि हर्ष होस्ट म्हणून दिसत आहेत. राघव शोमध्ये परतल्यानंतर देखील दोघे अजूनही शोचा एक भाग आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कमरिया गर्ल’नंतर आता ‘बेबो’ बनली आकांक्षा दुबे; करीनाची नक्कल करत दाखवल्या हॉट अदा

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

Latest Post