अच्छा! ‘या’ फंड्यामुळे भारतात शुक्रवारीच रिलीज होतात चित्रपट, तुम्हालाही मिळेल नवीन माहिती

0
264
Movies

शुक्रवार आला की, तुमच्यातील अनेकजण एकदम खुश होत असतील, नाही का. कारण एकदम सोप्पंय. शुक्रवार हा शेवटचा वर्किंग डे असतो. म्हणजे कसं त्यानंतर शनिवार- रविवार सुटीचे दिवस असतात ना. त्याचमुळे शुक्रवारी एकदम भारी भारी प्लॅन ठरत असतात. शुक्रवार अनेकांसाठी आनंदाचा यासाठीही असतो कारण त्यादिवशी नवीन चित्रपट रिलीज होत असतात. त्यामुळे अनेक सिनेरसिक शुक्रवारची आतुरतेने वाट पाहात असतात. शुक्रवार हा सिनेमांसाठी परिक्षेचा दिवसही असतो. कारण या दिवशी किती कमाई होते, यावरून साधारण सिनेमा किती चालेल याचा थोडाफार अंदाज येऊनच जातो, नाही का. शेवटी म्हणतात ना फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. मात्र, कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का बरं भारतात शुक्रवारीच चित्रपट का रिलीज होत असेल. काय कारण असेल यामागे. प्रश्न पडले असतीलच तर या लेखातून त्यांची उत्तरे जाणून घेऊया.

आता एक अंदाज तर तुम्ही बऱ्याच जणांनी बरोबर लावला असेल की, शुक्रवारनंतर येतात शनिवार- रविवार म्हणजे वीकेंड. अनेक जण वीकेंडला जरा रिलॅक्स होण्यासाठी चित्रपट पाहायला जातात. कधी कधी अनेकांना शुक्रवारी हाफ डे पण असतो. ते कलर टीव्ही येण्यापूर्वीही मुंबईत अनेक कंपन्यांना शुक्रवारी हाफ डे दिला जायचा. मग लोक शुक्रवारी सिनेमांचा प्लॅन करायचे. म्हणजे कसं ना की चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या तीनही दिवशी लोक जरा रिलॅक्स असतात, त्यामुळे सिनेमे पाहायला पसंतीही देतात. ही पद्धत फायदेशीर ठरू लागली आणि मग प्रथाच पडली. पण वीकेंड हे काही एकमेव कारण नाही बरं का.

तर त्याचं झालं असं की, १५ डिसेंबर, १९३९ रोजी गॉन विथ द वाईंड हा हॉलिवूड चित्रपट रिलीज झाला. त्यादिवशी नेमका शुक्रवार होता. त्याचमुळे हा चित्रपटापासून हॉलिवूडमध्ये शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्याची प्रथा सुरू झाली. आता हॉलिवूडही प्रथा चालवतेय म्हटल्यावर हा ट्रेंड भारतातही आला. ५०च्या दशकापूर्वी भारतात कधीही कोणत्याही दिवशी चित्रपट रिलीज व्हायचे, पण नंतर भारतातही शुक्रवारी सिनेमे रिलीज व्हायला लागले. ५ ऑगस्ट, १९६० रोजी रिलीज झालेला ‘मुघल-ए-आझम’ हा चित्रपटही शुक्रवारी रिलीज होणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रपटांमध्ये होता. आता ‘मुघल-ए-आझम’चं यश पाहता, हा सिनेमा ट्रेंडसेडर ठरणारंच होता. मग काय भारतातही शुक्रवारी सिनेमे रिलीज व्हायला सुरूवात झाली.

भारतात शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे हा शुभदिवस मानला जातो. हिंदू संस्कृतीत शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो, तर मुस्लिम धर्मामध्येही शुक्रवार शुभ समजला जातो. त्यामुळे प्रोड्यूसर, दिग्दर्शक शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्यालाच जास्त पसंती देताना दिसतात. अनेकदा तर चित्रपट रिलीज करण्यासाठी मुहूर्तही काढला जातो. आणखी एक कारण असंही सांगितलं जातं की, शुक्रवारी स्क्रिनिंग रेट कमी असतो, त्यामुळे थेटरच्या मालकांना बाकी दिवसांपेक्षा शुक्रवारी जरा कमी किंमत द्यावी लागते.

शुक्रवारी सिनेमा रिलीज करायची ही प्रथा जरी गेले सात-आठ दशकं सुरू असली, तरी तो काही नियम नाही बरं का. अनेकदा चित्रपट तारिख, वेळ, परिस्थिती पाहूनही रिलीज केले जातात. म्हणजे एखाद्या विशिष्ठ सण-समारंभाच्या दिवशी वैगरे पण चित्रपट रिलीज होतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारे ५ मराठी सिनेमे तुम्हाला माहितीयेत का? एका क्लिकवर घ्या जाणून

आशा भोसले, सुनील दत्त ते बच्चन कुटुंबीय! भारतीय सिनेसृष्टीने केलेले सगळे वर्ल्डरेकॉर्ड एकाच ठिकाणी

चेष्टा करताय व्हय! एका एपिसोडसाठी ‘एवढे’ लाख कोण घेतं का? वाचा सीआयडी कलाकार किती रुपये छापायचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here