Sunday, December 3, 2023

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अक्षराचा शिव तांडव पाहिला का? व्हिडिओ व्हायरल

छाेट्या पडद्यावरची लाेकप्रिय अभिनेत्री प्रणाली राठोडने ‘ये रिश्ता क्या कहलाता है‘ मधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच ती एक अप्रतिम गायिका देखील आहे. इतकेच नव्हे, तर प्रणाली एक सुंदर नृत्यांगना देखील आहे. प्रणालीला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. प्रणाली देखील कायमच विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते. दरम्यान प्रणालीने असे काही शेअर केले आहे, जे पाहिल्यानंतर चाहत्यांच्या तोंडून फक्त कौतुकच होत आहे.

प्रणाली राठाेड (pranali rathod) हिने इंस्टाग्रामवर शिव तांडव करतानाचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय उत्साहाता शिव तांडव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर अनेक वेळा पाणी शिंपडण्यात आले, त्यामुळे तिला मध्येच थांबावे लागले. पण तिची एनर्जी इतकी अफलातून हाेती की, चाहत्यांनी तिचे खूप कौतुक केले आहे.

व्हिडिओमध्ये प्रणाली काळ्या-सोनेरी पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. अशात तिचे शिव तांडव पाहून एका चाहत्याने लिहिले की, “ती एक देवी आहे, एक करिष्माई आत्मा आहे, ती जिथे जाते तिथे तिची जादू सर्वत्र पसरवते. ती निर्भय आहे, ती काली आहे, ती माँ दुर्गा आहे, ती सर्व काही आहे,ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही…ती तुमच्या विचारापेक्षा जास्त प्रतिभावान आहे.”

प्रणाली राठाेडचा हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सला खूप आवडला आहे. या व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. ‘गुम है किसी के प्यार में’ या टीव्ही मालिकेतील आयशा सिंगनेही तिच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, ‘तू एक अद्भुत मुलगी आहेस.'(ye rishta kya kehlata hai fame tv actress pranali rathod shiv tandav video goes viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अदिती राव हैदरी ‘या’ अभिनेत्यासाेबत राजस्थानमध्ये घेतेय सुट्टयांचा आनंद, फाेटाे व्हायरल

नव्या नवेली नंदा मुंबई विमानतळावर दिसली रुमर्ड बाॅयफ्रेंडसाेबत; चाहते म्हणाले, ‘नजर ना लगे…’

हे देखील वाचा