Thursday, April 24, 2025
Home नक्की वाचा विषये का! 2022मधील सर्वात श्रीमंत अभिनेते, फ्लॉप सिनेमे देऊनही कमावला बक्कळ, ‘हा’ पठ्ठ्या अव्वलस्थानी

विषये का! 2022मधील सर्वात श्रीमंत अभिनेते, फ्लॉप सिनेमे देऊनही कमावला बक्कळ, ‘हा’ पठ्ठ्या अव्वलस्थानी

बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे सिनेमे नेहमीच चर्चेचा विषय असतात. 2022मध्ये अनेक सुपरस्टार्सचे सिनेमे जोरदार आपटले. बॉक्स ऑफिसवर त्यांना बजेट इतकी कमाईही करता आली नाही. मात्र, या सिनेमांसाठी त्यांनी चांगलेच मानधन घेतले होते. त्यामुळे 2022मध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा मानही त्यातील काही कलाकारांनी मिळवला. चला तर या लेखातून जाणून घेऊयात 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या 5 बॉलिवूड कलाकारांबद्दल…

सन 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणारे बॉलिवूड कलाकार
शाहरुख खान
या यादीतील पहिले नाव बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) याचे आहे. शाहरुख मागील 4 वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. त्याचे अनेक सिनेमे फ्लॉप ठरले आहेत. तरीही त्याच्या कमाईवर याचा कोणताही फरक पडला नाहीये. कमाईच्या बाबतीत शाहरुख आजही बॉलिवूडचा ‘बादशाह’ आहे. सन 2022मध्ये शाहरुख बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत कलाकार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याची एकूण संपत्ती ही 700 मिलियन डॉलर्स म्हणजेच तब्बल 58 अब्ज रुपये आहे.

अमिताभ बच्चन
‘महानायक’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचाही या यादीत समावेश होतो. अमिताभ हे बॉलिवूडसोबतच त्यांच्या कमाईच्या बाबतीतही ‘शहंशाह’ आहेत. अमिताभ यांनी वयाच्या 80व्या वर्षीही फिटनेस तसेच कष्टाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान बनवले आहे. ‘बिग बी’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ छोट्या पडद्यावरही सक्रिय असतात. ते जाहिरातींच्या माध्यमातूनही लक्ष वेधतात. त्यांना टीव्ही जाहिरातींमधूनही बक्कळ पैसा मिळतो. 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांमध्ये दुसऱ्या स्थानी अमिताभ बच्चन आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांची एकूण संपत्ती 500 मिलियन डॉलर्स म्हणजेच, 41 अब्ज रुपये आहे.

सलमान खान
बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजेच सलमान खान (Salman Khan) 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्याचे मागील काही सामने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, तर काहींनी चांगली कमाई केली. याव्यतिरिक्त सलमानची चित्रपट निर्मिती कंपनीदेखील आहे. त्यातूनही तो बक्कळ पैसा कमावतो. त्याची एकूण संपत्ती 380 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 33 अब्ज रुपये आहे.

ऋतिक रोशन
सन 2022मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांमध्ये ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याचा चौथा क्रमांक लागतो. साधारणत: ऋतिक लाईमलाईटपासून दूर असतो. तसेच, त्याच्या कामावर जास्त लक्ष देतो. ऋतिक सर्वाधिक तरुणाईमध्ये चर्चेत असतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऋतिकची एकूण संपत्ती ही 370 मिलियन डॉलर्स म्हणजेच 30 अब्जाहून अधिक आहे.

अक्षय कुमार
‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) हा एका वर्षात 5 ते 6 सिनेमे करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, 2022मध्ये अक्षयचे अनेक सिनेमे एका पाठोपाठ आपटले. मात्र, रिलीजनंतर तो सातत्याने कमाई करत आहे. 2022मध्ये अक्षयचे काही सिनेमे ओटीटीवरही रिलीज झाले. माध्यमांतील वृत्तांंनुसार, अक्षयची एकूण संपत्ती ही 370 मिलियन डॉलर्स म्हणजेच 30 अब्जापेक्षा जास्त आहे. (year ender 2022 richest bollywood celebs see list)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वरुणने वाघासोबत, तर अनुष्काने कुटुंबासोबत म्हटले 2022ला बायबाय, पाहा कलाकारांच्या हटके पोस्ट
आता बॉक्स ऑफिस हादरणार! 2023मध्ये पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार ‘या’ जोड्या, यादी पाहाच

हे देखील वाचा