‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण; सिनेमातील बालकलाकार झालेत चांगलेच मोठे, तुम्ही ओळखलं का?

सन २००१ मध्ये आख्खं बॉलिवूड गाजवणारा चित्रपट कोणता? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, तर प्रत्येकाच्या तोंडी ‘कभी खुशी कभी गम’ हे नाव आल्याशिवाय राहणार नाही. हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे झाली आहेत. हा चित्रपट १४ डिसेंबर, २००० रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यात असलेल्या दिग्गज कलाकारांचा भरणा असल्यामुळेच नाही, तर या चित्रपटातील डायलॉग्जमुळे गाजला होता. आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटातील ‘पूजा’शी आणि या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खानच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या ‘क्रिश’बद्दल सांगणार आहोत. आता हे दोघेही मोठे झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्या या चित्रपटातील डायलॉग पुन्हा रिक्रिएट केले आहेत. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘कभी खुशी कभी गम’मधील ‘क्रिश’ म्हणजेच अभिनेता जिब्रान खानने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जिब्रान चित्रपटातील डायलॉग्ज बोलताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “जर आयुष्यात काही करायचे, मिळवायचे असेल, तर नेहमी मागे जा आणि #K3G पुन्हा पाहा. हा असा चित्रपट आहे, जिथे मी कॅमेऱ्याच्या प्रेमात पडलो आणि या लिल क्रिशला सेटवर इतका ‘चिल पिल’ वेळ दिल्याबद्दल करण जोहर आणि संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे आभार,” असे लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan)

दुसरीकडे या चित्रपटातील करीनाची लहानपणीची भूमिका साकारणारी ‘पूजा’ म्हणजेच मालविका राज या चित्रपटात तिने खूप चांगली कामगिरी केली आहे. मालविकाने एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. तिने चित्रपटातील तिचा प्रसिद्ध डायलॉग घेऊन व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “एक सदाबहार चित्रपट, दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारा आणि उस्ताद करण जोहरद्वारे दिग्दर्शित केलेला आहे… ज्या कलाकृतीसाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे, हीच माझी ओळख होती. K3G हा माझ्यासाठी खरा सन्मान आहे!”

View this post on Instagram

A post shared by Malvika Raaj (@malvikaraaj)

खरं तर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पुनित मल्होत्रा यांनी देखील या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यांनी त्यावेळीचा आणि आताचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “माझा पहिला चित्रपट, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून माझा पहिला चित्रपट. करण जोहर, अशा आठवणींसाठी धन्यवाद.”

करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन, काजोल, करीना कपूर, ऋतिक रोशन यांसारखे मोठे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वात हिट चित्रपट होता.

खूप वर्षापासून करण जोहर बॉलिवूडला हिट चित्रपट देत. त्याचा अजून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटांमध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. त्या चित्रपटाचे नाव ‘रॉकी और राणी’ असे आहे.

हेही वाचा-

Latest Post