Wednesday, July 2, 2025
Home अन्य ‘सिद्धार्थ शुक्ला’ आणि ‘शहनाज गिल’ यांचा हेड मसाज करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल, काही मिनिटांतच १.५ लाख व्ह्यूजचा वर्षाव

‘सिद्धार्थ शुक्ला’ आणि ‘शहनाज गिल’ यांचा हेड मसाज करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल, काही मिनिटांतच १.५ लाख व्ह्यूजचा वर्षाव

‘शहनाज गिल’ आणि ‘सिद्धार्थ शुक्ला’ यांच्या मैत्रीचे किस्से तर ‘बिग बॉस 13’ या पर्वापासूनच सर्वांना परिचित आहेत. बिग बॉसमध्ये त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. घरात सुद्धा त्यांच्या मैत्रीने लाखो बिग बॉस चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आणि बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत असतात. अशातच शहनाज गिल हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्या दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ तिचा हेड मासाज करताना दिसत आहे. या सोबत ती व्हिडिओला कॅप्शन देत असे लिहिते की, “मी मैत्रीचा चांगलाच फायदा घेत आहे.” शहनाज आणि सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या या व्हिडिओला अगदी काही मिनिटातच 1.5 लाख पेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले. इंस्टाग्राम अकाऊंटवरील तिच्या या व्हिडिओला नेहमी प्रमाणेच प्रेक्षकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीने बिग बॉस 13 मध्ये खूपच धमाल केली आहे. बिग बॉसच्या घरात राहून त्या दोघांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या ‘भुला दुंगा’ या गाण्याने 100 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. तसेच त्यांचं ‘शोना शोना’ हे गाणे देखील यूट्यूबवर धमाल करत आहे. त्यांचं #sidnaaz हा हॅश टॅग खूपच लोकप्रिय झाला होता. सोशल मीडियावर देखील तो खूपच ट्रेंड होताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ

हे देखील वाचा