दिशा पटानी हिचा एक डान्स व्हिडिओ मागच्या वर्षी खूपच व्हायरल झाला होता. तिच्या चाहत्यांनी तिच्या या डान्सला खूपच पसंती दर्शवली होती. नुकताच दिशाने आपला एक नवीन डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये ती हेमा मालिनीचं गाणं ‘मेरे नसीब में तू हैं की नहीं ‘ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स बघितल्यावर प्रत्येक व्यक्तीला तिचा डान्स टीचर कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.
‘डिंपल कोटेचा’ असे तिच्या डान्स टीचरचं नाव आहे. डिंपलने केवळ दिशालाच नाही, तर यामी गौतमी, निधी अग्रवाल, अलाया एफ यांना देखील डान्स शिकवला आहे.
डिंपल कोटेचा हिचे असे म्हणणे आहे की, “जेव्हा पण तुम्ही एखाद्या लॉन्चमध्ये सामील होता किंवा त्यात नवीन असता, तेव्हा तुम्हाला डान्स शिकणे खूप गरजेचे असते. प्रत्येक जण हे बघत असतो की, तुम्ही किती फिट आणि सुंदर आहात. ती अभिनय क्लासेस देखील घेते आणि जिम सुद्धा करते. तसेच ती डान्स देखील शिकते. हे एक स्किल आहे. जे प्रतेकाला जाणून घेणं खूप गरजेचं असतं.”
डिंपल म्हणते की, “आधीच्या आणि अताच्या डान्स स्टाईलमध्ये खूपच फरक पडला आहे. हे आम्ही सुद्धा स्वीकारतो की आता बॉलिवूडमध्ये देखील खूप बदल झाला आहे. आधीच्या चित्रपटातील गाणी अत्यंत सिंपल आणि साध्या मुव्हज असायच्या. परंतु आता तुम्हाला प्रत्येक 2 सेकंदाला 8 वेगळ्या डान्स स्टेप्स घ्यायला लागतात. ही नवीन पिढी आणि प्रेक्षक हे काहीतरी नवीन बघत असतात. यामुळेच इंडस्ट्रीने डान्स चित्रपटांवर देखील भर द्यायला सुरुवात केली आहे. यामुळेच तुम्ही तुमच्या कामात एकदम परफेक्ट असणं गरजेचं आहे.”
“मी ज्यांना डान्स शिकवते, तेव्हा मी सगळ्यात आधी या गोष्टींवर फोकस करते की, त्यांना कोणत्या डान्स स्टेप चांगल्या वाटतील. तसेच त्या कोणत्या पद्धतीने चांगल्या प्रकारे सादर करता येतील. मला खूप छान वाटते, जेव्हा ते त्यांच्या बॉडी आणि मसल सोबत कंफर्टेबल होऊन डान्स करतात. अशाच प्रकारे मी कोरिओग्राफी देखील करते,” असेही आपल्या डान्स शिकवण्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…