ओटीटी प्लॅटफॉर्मवर चाहत्यांच्या पसंतीस पडलेली वेब सीरिज म्हणजेच मिर्झापूर-२. ही वेब सीरिज रिलीझ झाल्यानंतर यातील सर्वच कलाकार चर्चेत आले होते. यातील महिला कलाकारांची भूमिका दमदाररीत्या दाखवण्यात आली आहे. यामध्ये कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठी हिला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. बीनाची भूमिका अभिनेत्री रसिका दुग्गल हिने साकारली होती. मागील काही काळापासून ती सातत्याने टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये काम करताना दिसत आहे.
रसिका झारखंडच्या जमशेदपूर येथील आहे. तिचा जन्म सन १९८५ मध्ये झाला होता. सन २००४ मध्ये तिने दिल्लीच्या महिला श्रीराम कॉलेज ऑफ वुमेनमधून गणितात बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री घेतली होती. यानंतर तिने सोफिया पॉलिटेक्निकमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. अभिनयाची आवड पाहून तिने पुण्याच्या एफटीआयमधून अभिनयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला.
रसिका दुग्गलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००७ मध्ये बॉलिवूडमधील अनवर चित्रपटाने केली. तिने या चित्रपटात चरित्र भूमिका साकारली होती. सन २००८ मध्ये तिने ‘तहान’ चित्रपटात अभिनय केला. टीव्हीएफच्या वेब सीरिज पर्मनेंट रूममेट्स सिझन-२ मध्ये तिने कॅमियोची भूमिका निभावली. यानंतर टीव्हीएफच्याच दुसऱ्या एका वेब सीरिज ह्युमरसली युवर्स (२०१७) मध्ये काम केले होते.
सन २०१७ मध्ये रिलीझ झालेला चित्रपट ‘तू है मेरा संडे’मध्ये कॅमियोची भूमिका साकारली. यामध्ये वरून सोबती, विशाल मल्होत्रा, सहाना गोस्वामी, नकूल भल्ला, अविनाश तिवारी आणि जय उपाध्याय मुख्य भूमिकेत होते. याव्यतिरिक्त रसिकाने ‘औरंगजेब’, ‘मंटो’ आणि ‘लूटकेस’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
रसिकाने पहिल्यांदा पावडर या टेलिव्हिजन सिरीजमध्ये काम केले व त्यानंतर तीला सतत वेबसिरीजमध्ये भूमिका मिळत गेल्या. तीने जवळपास ९ वेबसिरीज, ८ टेलीव्हिजन सिरीज व १६ चित्रपटांत काम केले आहे. सध्या तीची द सुटेबल बॉय ही सिरीज खूप गाजत आहे.
मिर्झापूरमध्ये कालीन भय्याच्या पत्नीची भूमिका साकारल्यानंतर रसिकाच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर रसिकाचे लग्न अभिनेता मुकुल चड्डाशी झाले आहे. लग्नानंतरही ती सातत्याने चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे. इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांच्या संख्या लाखांच्या घरात आहे.
वाचा- कालीन भैय्याचा नादच नाही, वाचा पंकज त्रिपाठी सोबत घडलेला हा किस्सा