Monday, September 25, 2023

पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

आजपर्यंत आपण अनेकदा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबद्दल ऐकले असेल. याबद्दल अनेक बातम्या ऐकल्या, पाहिल्या असतील. आतापर्यंत अनेक कलाकारांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे. किंबहुना हे कलाकार त्यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक या बातम्यांमुळेच अधिक प्रसिद्ध झाले. यातलीच एक अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. हो तीच ती ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमातील. मंदाकिनी त्यांच्या चित्रपटांमुळे जेवढ्या गाजल्या नाही, तेवढ्या त्या या सिनेमातील त्यांच्या बोल्ड दृशांमुळे आणि दाऊदसोबत असलेल्या संबंधांमुळे गाजल्या. आज मंदाकिनी (mandakini) 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक महिती.

मंदाकिनी यांचा जन्म ३० जुलै १९६३ साली उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे झाला. त्यांचे खरे नाव यास्मिन जोसेफ असे आहे. मंदाकिनी यांचा जन्म अँग्लो इंडियन परिवारात झाला, त्यांचे वडील हे बिटिश होते. मंदाकिनी यांचे करिअर छोटे होते, मात्र हेच छोटे करिअर चांगल्या वाईट घटनांमुळे अतिशय गाजले. मंदाकिनी यांना ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाआधी तीन फिल्ममेकर यांनी नाकारले होते. (mandakini birthday special story know about her life)

मंदाकिनी या ८०/९० च्या दशकात टॉपच्या अभिनेत्रींमध्ये कधीच सामील झाल्या नाही. त्यांनी १९८५ ला ‘मेरा साथी’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. राज कपूर यांनी मंदाकिनी यांना पहिल्यांदा पाहिले होते. त्यावेळी त्या फक्त २२ वर्षांच्या होत्या. राज कपूर यांनी मंदाकिनी यांना ‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमात घेण्याआधी, त्यांचे नाव यास्मिन बदलून मंदाकिनी ठेवले.

मंदाकिनी यांनी या सिनेमात प्रचंड बोल्ड सीन्स दिले होते. यातही धबधब्याखाली बसलेला सीन तर अतिबोल्ड होता. या सीनमध्ये त्यांनी फक्त पांढऱ्या रंगाची साडी नेसून त्या धबधब्याखाली उभ्या होत्या. या सीनला राज कपूर यांनी सेन्सर बोर्डातून कसे पास करून घेतले, याबद्दल माहिती कुठेच नाही.

मंदाकिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘आग और शोला’, ‘अपने अपने’, ‘प्यार करके देखो’, ‘हवालात’, ‘नया कानून’, ‘दुश्मन’ आदी सिनेमांमध्ये काम केले. त्या १९९६ साली शेवटच्या ‘जोरदार’ या सिनेमात दिसल्या.

https://www.instagram.com/p/CF_zKrPBcLe/?utm_source=ig_web_copy_link

त्यांच्यासाठी १९९४ साल खूप वाईट ठरले. कारण त्यावर्षी त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत काही फोटो व्हायरल झाले. हे फोटो पाहून सर्वानाच मोठा धक्का बसला. १९९४-१९९५ साली दुबईमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचच्या दरम्यान मंदाकिनी यांना दाऊदसोबत पाहिले गेले. हे फोटो पाहून अनेक कथा बातम्यांमध्ये आल्या. मात्र मंदाकिनी यांनी या सर्व गोष्टी नाकारल्या.

मंदाकिनी यांचे करियर १९९६ साली आलेल्या ‘जोरदार’ सिनेमासोबत जोरदार संपले. असे सांगितले जाते की, दाऊदमुळेच मंदाकिनी यांना काही चित्रपटांमध्ये घेण्यात आले. पण जेव्हा त्यांची बदनामी व्हायला लागली, तेव्हा त्यांना काम मिळने बंद झाले. मंदाकिनी यांनी नेहमी त्यांचे आणि दाऊदचे संबंध असल्याचे नाकारले.

पुढे मंदाकिनी यांनी १९९६ नंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. त्यांनी १९९० साली माजी बुद्धिस्ट मोंक डॉक्टर कग्यूर टी रिनपोचे ठाकुर यांच्याशी लग्न केले. त्यांना राबिल ठाकूर आणि इनाया ठाकूर अशी दोन मुलं आहेत. सध्या मंदाकिनी या दलाई लामा यांच्या फॉलोवर असून त्या तिबेटियन लोकांना योगा शिकवतात.

अधिक वाचा- 
अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद
‘प्रेक्षक 300 रुपयात चित्रपट का पाहतील?’, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केले खळबळजक वक्तव्य

हे देखील वाचा