Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

वडील राजा चौधरीला का इग्नोर करतीये पलक तिवारी ? आईने सांगितलयं…

राजा चौधरी (raja chaudhary) हे टेलिव्हिजन दुनियेतील असे नाव आहे की, जे वादविवादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. राजा चौधरी आधीच दोन लग्न तुटल्याने दु:खी होते, त्यामध्येच त्यांनी ब्रेकअपचे दु:खही सहन केले होते आणि आता त्यांची मुलगी पलक तिवारी (palak tiwari) तिलाही आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वेळ नाही. राजा चौधरी या गोष्टीवरुन खूपच दु:खी आहेत. त्यांच्या जीवनातील जवळच्याच व्यक्तींनी भावनिकरित्या त्यांना दु:ख पोहचवले आहे आणि आता ते पुर्णपणे तुटलेले आहेत.

बाबा चौधरीला दुर्लक्षित करत आहे पलक :

राजाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी पलकला शेवटचे लहान असताना पाहिले होते, पण ती खुप व्यस्त होती आणि ती मला जास्त वेळा भेटलीही नव्हती. मी तीला मेसेज आणि ई-मेल करण्याचाही प्रयत्नही केला होता, पण मला उत्तर मिळाले नाही. कदाचित तिने मला दुर्लक्षित केले असावे.”

आई वडिलांनीही नाही दिला साथ :

राजा चौधरीने स्विकार केला की, त्यांना दारुचं व्यसन लागलं आहे. दारु सोडण्यासाठी त्यांनी डॉक्टरांचीही मदत घेतली होती, पण राजा चौधरीच्या डॉक्टरने सांगितले की, “व्यसनमुक्त होणे फारच कठीण आहे कारण ते नशेमध्ये पुर्णपणे बुडालेले आहेत.” यानंतर त्यांच्या आई-वडिलांनीही त्यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना मुंबईला पाठवले. ते असे म्हणतात की, “मी मुंबईसाठीच बनलो आहे.”

एवढा खराबही नाही जेवढी दुनिया समजते! :

राजा तिवारीने श्वेता तिवारी बरोबरचा एक अनुभव सांगितला की, “जेव्हा मी श्वेता तिवारीपासून वेगळा झालो तेव्हा तिने माझ्यावर आरोप केला होता की, मी तीच्यावर घरगुती अत्याचार केले आहेत.” या सगळ्या आरोपावर राजा चौधरी म्हणाले की, “जेवढं मला खराब दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तेवढा मी खराब नाहीए.”

श्वेतासोबतचे गैरसमज दूर करणार होते! :

राजा चौधरी आणि श्वेता तिवारी हे १९९८ मध्ये लग्न बंधनात अडकले होते. राजा चौधरी हे दारु पिऊन मारहान करत असल्यामुळे श्वेता तिवारी वेगळी झाली. राजाने हेही सांगितले की, “मी २०२१ मध्ये १३ वर्षांनी मी माझ्या मुलीला भेटलो होतो. एका मुलाखतीत राजाने असेही सांगितले आहे की, श्वेतासोबत बोलून सगळे गैरसमज दूर करणार होतो.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

लग्नाचा मुहूर्त ठरलं! रिचा चढ्ढा आणि अली फजल ‘या’ दिवसी अडकणार विवाहबंधनात

रजनीकांत यांनी राज कुमारचे नाव ऐकल्यावर का दिला होता चित्रपटात काम करण्यास नकार, वाचा कारण

‘मिर्झापूर’मधील मुन्ना भेैय्या दिसणार अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये? कार्तिक आर्यनचा मोठा खुलासा

बाबा चौधरीला दुर्लक्षित करत आहे पलक! ई-मेललाही उत्तर नाही;

हे देखील वाचा