Friday, January 16, 2026
Home बॉलीवूड भेटा मिथुन चक्रवर्तीच्या मुलीला; दिशानीचे स्टायलिश पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वा क्या बात हैं’

भेटा मिथुन चक्रवर्तीच्या मुलीला; दिशानीचे स्टायलिश पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वा क्या बात हैं’

आजकाल बॉलिवूडमध्ये स्टारकिड्स मोठ्या प्रमाणावर आपले नाव कमावताना दिसत आहेत. काही स्टारकिड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे, तर काहीजण रांगेत आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी. मिथुन आणि योगिता बाली यांना दिशानी चक्रवर्ती नावाची एक मुलगी आहे. अद्याप ही स्टारकिड चित्रपटांमध्ये दिसली नसली, तरीही ती याआधीच प्रसिद्ध झाली आहे.

तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टचे बरेच कौतुक होत आहे. तसेच, तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरलही झाले आहेत. फारच कमी लोकांना माहिती आहे की, ती महाक्षय, उश्मे आणि नामशी चक्रवर्तीची बहीण आहे.

दिशानी चक्रवर्ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि बर्‍याचदा ती तिचे स्टायलिश फोटोही शेअर करते. दिशानी अधूनमधून फोटोशूट्सही करत असते. तिचा कल मॉडेलिंगकडे आहे, असे या फोटोवरून स्पष्टपणे दिसून येते. या फोटोशूट्सचे फोटो तिने इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. याशिवाय इंस्टाग्रामवर तिचे सुमारे 70 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

मिथुन आणि योगिता यांनी 90च्या दशकात दिशानीला दत्तक घेतले होते. ती तिच्या आई- वडिलांची आणि भावांची खूप लाडकी आहे. तिने अद्याप मोठ्या पडद्यावर तिची झलक नाही दाखवली. पण 2017 मध्ये तिने तिच्या भावाने दिग्दर्शित केलेल्या ‘होली स्मोक’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे. याव्यतिरिक्त ती ‘अंडरपास’, ‘सबटल एशियन डेटिंग विथ पीबीएम’ यासारख्या काही शॉर्ट फिल्ममध्येही दिसली आहे.

याव्यतिरिक्त फिल्मी कुटुंबात वाढलेल्या दिशानीला चित्रपटांचीही खूप आवड आहे. ती सलमान खानची खूप मोठी चाहती आहे. वृत्तानुसार, दिशानी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये अभिनयाचा कोर्स करत आहे. तिला चित्रपटामध्ये तिची कारकीर्द बनवायची आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: मौनी रॉयने मैत्रिणीसोबत लावले ‘शावर’ गाण्यावर ठुमके, अदा पाहून चाहतेही घायाळ

-शूटिंग दरम्यान चाहत्यांची गर्दी, वैतागलेल्या अवस्थेतही वरुणने अत्यंत प्रेमाने केली विनंती, व्हिडिओ व्हायरल

-राखी सावंत बनली ‘नागिन’, पाहा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेत्रीचा अवतार

हे देखील वाचा