Thursday, February 12, 2026
Home बॉलीवूड जान्हवीच्या मागे धावला बॉयफ्रेंड, तरीही थांबली नाही अभिनेत्री; नेमकं झालंय तरी काय?

जान्हवीच्या मागे धावला बॉयफ्रेंड, तरीही थांबली नाही अभिनेत्री; नेमकं झालंय तरी काय?

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकीर्दीत सुपरहिट सिनेमे देऊन अफाट लोकप्रियता मिळवली. आता त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत त्यांची मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हीदेखील प्रसिद्धीचे शिखर गाठत आहे. २०१८ साली ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या जान्हवीने आतापर्यंत ७ सिनेमात काम केले आहे. मात्र, ४ वर्षांच्या कमी काळातही तिने मोठा पल्ला गाठला आहे. ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिला सोशल मीडियावर १ कोटीहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळते. आता तिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

नेहमीच आनंदात दिसणारी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती खूपच उदास दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जान्हवीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती तिच्या कथित बॉयफ्रेंड ओरहान अवत्रामणि (Janhvi Kapoor Rumoured Boyfriend Orhan Awatramani) याच्यासोबत पार्टी करून एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मात्र, रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना जान्हवी चिंतेत असल्याचे दिसत आहे. तसेच, नेहमी पॅपराजींना हसत हसत पोझ देणारी जान्हवी काहीही न बोलता थेट आपल्या गाडीच्या दिशेने जाताना दिसते. त्यानंतर तिची गाडी येते आणि ती तिथून जाताना दिसते. ती गेल्यानंतर तिच्या मागे ओरहान अवत्रामणि (Orhan Awatramani) हादेखील धावताना दिसतो. तसेच, रेस्टॉरंटच्या गेटवर उभा राहून म्हणताना दिसतो की, “जान्हवी निघून गेली.” जान्हवीच्या या व्हिडिओवर चाहते अंदाज व्यक्त करत आहेत की, तिचे आणि ओरहानमध्ये भांडण झाले आहे का? दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिले आहे की, “जान्हवी इतकी नाराज का आहे?”

जान्हवीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर ३० हजारांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला आहे. याव्यतिरिक्त जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर मागील महिन्यात तिचा ‘गुड लक जेरी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा साऊथच्या ‘कोलामावू कोकिला’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. मूळ सिनेमात नयनतारा मुख्य भूमिकेत होती, तर हिंदी सिनेमात जान्हवी मुख्य भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त तिच्या खात्यात ‘जन गण मन’ हा सिनेमाही आहे. या सिनेमात ती विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडे यांच्यासोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
मुहूर्त ठरला! ‘पुष्पा २’ बद्दल रश्मिकाने दिली महत्वाची अपडेट, पोस्ट व्हायरल
वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा
सपना चौधरी विरोधात अटक वारंट जारी, पाहा काय आहे प्रकरण

हे देखील वाचा