Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड लयचं आगाऊ झालाय करीना अन् सैफचा जहांगीर, छोट्या खानचा व्हिडिओ पाहिला का?

लयचं आगाऊ झालाय करीना अन् सैफचा जहांगीर, छोट्या खानचा व्हिडिओ पाहिला का?

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे बॉलिवूडमधील स्टार कपल आहे. हे दोघं नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात, त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करीना आणि सैफसोबतच त्यांची मुलं तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan) देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होताना दिसतात. मोठ्या कलाकारांएवढी लोकप्रियता या दोघं भावांना आहे. तैमूर तर एका मोठ्या लोकप्रिय स्टार किडमध्ये गणला जातो. तर जहांगीरचे गाेंडस व्हिडिओ साेशल मीडियावर भन्नाट व्हायरल हाेतात. अशातच जहांगीरचा लेटेस्ट व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे. 

समाेर आलेल्या व्हिडिओमध्ये जहांगीर पॅपराजीला बघून फारच उत्साही हाेताे आणि त्यांच्यासाेबत खेळण्याच्या मूडमध्ये असताे. जहांगीर आपल्या केअरटेकर (काळजी घेणारे व्यक्ती) यांचा हात साेडून पळताे. इतकच नाहीतर ताे हट्ट करत – करत भर रसत्यात जमिनीवर बसताे. ज्यानंतर जहांगीरचे केअरटेकर त्याला बळजबरीने कडेवर उचलून घेऊन जातात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जहांगीरचा हा गाेंडस व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. एका युजरने कमेंट करत लिहीले की, “हा किती गाेंडस आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “त्याला फाेटाेग्राफर आवडले आहे.”

सैफ आणि करीनाला त्यांचा दुसरा मुलगा जहांगीरच्या नावावरून ट्रोल केले जात हाेते. याआधी त्यांना त्यांचा पहिल्या मुलगा तैमूरच्या नावावरून देखील ट्रोल केले गेले होते. ज्यावरुन त्यांनी अद्याप जहांगीरचं पूर्ण नाव रिवील केले नाही. करीनाने तिच्या प्रेग्नन्सीच्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिले असून, ते सध्या चांगलेच गाजताना दिसत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा:
‘आता वेळ आलीये…’, चंदिगड विद्यापीठातील व्हायरल एमएमएसवर सोनू सूदचा संताप

बोल्ड अँड ब्युटीफूल! जान्हवीचे लेटेस्ट फोटो तुम्हालाही करतील घायाळ
सोनाली कुलकर्णी स्टाईल एकदम भारी! एकदा फोटो पाहाच

हे देखील वाचा