Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड ‘हे’ असणार अमिताभ बच्चन यांचे नवीन निवासस्थान? बिग बींनी 31 व्या मजल्यावर खरेदी केले अलिशान अपार्टमेंट!

‘हे’ असणार अमिताभ बच्चन यांचे नवीन निवासस्थान? बिग बींनी 31 व्या मजल्यावर खरेदी केले अलिशान अपार्टमेंट!

अष्टपैलू भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश होतो. सध्या अमिताभ यांचा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. तसेच, दुसरीकडे ते छोट्या पडद्यावरही ‘कौन बनेगा करोडपती 14‘ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. पण आज आम्ही अमिताभ बच्चन यांच्या कोणत्याही चित्रपटाबद्दल किंवा शोबद्दल बोलणार नाही, तर त्यांच्या नवीन अपार्टमेंटबद्दल सांगणार आहोत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अमिताभ बच्चन (Amitabh Bachcha) यांनी मुंबईत पार्थेनॉन सोसायटीमध्ये एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. बिग बींचे हे अपार्टमेंट ३१व्या मजल्यावर आहे. अमिताभ बच्चन यांनी गुंतवणुकीसाठी हे अपार्टमेंट घेतले आहे. अभिनेता त्याच्या संपूर्ण कुटुंबासह जुहू बंगला ‘जलसा’ येथे राहतात. याशिवाय त्यांचा ‘प्रतीक्षा’ हा देखील बंगला आहे, जिथे त्यांची सतत ये-जा असते.

महानायक अमिताभ यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला (Pratiksha Bungalow) हा जुहूमध्ये आहे. ते त्यांच्या आई-वडिलांसोबत तिथेच राहायचे. मात्र, त्यांच्या निधनानंतर अमिताभ त्यांच्या ‘जलसा’ या दुसऱ्या बंगल्यामध्ये शिफ्ट झाले. आता अमिताभ त्यांच्या कुटुंबासोबत ‘जलसा’ बंगल्यामध्येच राहतात. असे असले, तरीही ‘प्रतीक्षा’ हा बंगला अमिताभ यांच्या खूप जवळ आहे आणि ते नेहमी वेळ घालवण्यासाठी तिथे जातात. बर्‍याच वेळा बिग बी जलसामधून बाहेर पडतात आणि त्यांच्या चाहत्यांना भेटतात. मात्र, कोविडपासून ही प्रक्रिया सध्या थांबली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अमिताभ बच्चन आपल्या ‘केबीसी’ शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही बिग बींची दमदार भूमिका पाहायला मिळत आहे. त्यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटातून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मीका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय ‘उच्छाई’ हा अमिताभ यांचा आगामी चित्रपट आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! एकेकाळच्या दिग्गज अभिनेत्रीकडे नाहीयेत उपचारासाठी पैसे, हॉस्पिटलमध्ये आहे ऍडमिट
‘माझ्या अंगठीने कितीतरी लोक खरेदी करता येतील’, काजोलच्या वक्तव्याने पेटून उठले नेटकरी; म्हणाले…
नवाब सैफचा मजेशीर खुलासा! फार्महाऊसवर कोंबड्या पकडण्यासाठी ठेवलाय ‘कोंबडा’, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा