लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत असते. तिने आपल्या फिटनेससाठी खूप कष्ट घेतले आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवरून या गोष्टीचा खुलासा होत आहे. तिने नुकतेच डार्क ग्रीन गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ती प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळवत आहे.
तिने डीपनेक स्लिम फिट ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तसेच तिच्या चाहत्यांकडूनही या फोटोज खूप प्रेम मिळत आहे. त्यामध्ये तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कोणतीच ज्वेलरी घातली नाहीये. हे फोटो शेअर करत तिने “मी जन्मल्यापासून निर्भीड आहे,” असे कॅप्शन लिहिले आहे.
या फोटोमध्ये तिचं खूपच ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. तिचा आधीच लूक आणि आताच लूक यामध्ये खूपच बदल झाला आहे. यासोबत तिने असेही लिहले आहे की, “मला आजमावू नका.”
श्वेताचे वय आता जवळपास 40 आहे. तरीही अजूनही ती तिच्या सौंदर्याने सगळ्यांना आकर्षित करते. तिच्या या लेटेस्ट फोटोवर तिच्या चाहत्यांव्यतिरिक्त इंडस्ट्रीमधील काही कलाकार देखील लाईक्स आणि कमेंट करत आहेत.
या सोबतच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. यात ती खूपच गोड दिसत आहे. श्वेताने ‘मेरे डॅड की दुल्हन’ या चित्रपटातून सगळ्यांचे मन जिंकले होते. तसेच टीव्हीवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केले आहे. तिच्याकडे बघून कोणालाच विश्वास बसणार नाही की ती दोन मुलांची आई आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खास मैत्रिणीच्या लग्नात आलीयाचा ‘गेंदा फूल’वर डान्स, गर्ल्स गँगबरोबर लावले जोरदार ठुमके
-पाण्यात आग लागताना कधी पाहिली आहे का? नसेल तर हा पाहा नेहा धुपियाचा जबराट व्हिडिओ










