Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जुन्या आठवणी ताज्या करत नंदिता दासने शेअर केली पोस्ट, पाहा अभिनेत्रीचा ‘थ्रोबॅक’ फोटो, ओळखणेही झाले कठीण

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत विशेष नाव कमावलेली अभिनेत्री नंदिता दास आता अचानक चर्चेत आली आहे. ‘थ्रोबॅक थर्सडे’ निमित्त नंदिताने तिचा एक जुना फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दास हिने आपल्या कुटुंबाचा जुना फोटो कोलाज शेअर केला आहे. या फोटोत नंदिता तिच्या चुलत भावासह म्हणजेच सिद्धार्थ दाससोबत दिसली आहे.

फोटो थोडा अस्पष्ट आहे. या थ्रोबॅक फोटोमध्ये नंदिता दास अगदी लहान दिसत आहे. ती कॅमेर्‍याकडे पाहून हसली आहे, तसेच तिचे केस कटोरा कट स्टाईलने कापलेले दिसत आहेत. याला कटोरा कट यासाठी म्हणतात, कारण या कटमध्ये डोकं उलट्या वाटी सारखे दिसते.

इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर करत नंदिता म्हणाली की, ती प्रत्येक उन्हाळ्याची सुट्टी ओडिशाच्या बारीपाडा येथे तिच्या वडिलांच्या घरी घालवायची. नंदिता दास पद्मभूषण विजेते चित्रकार जतिन दास यांची मुलगी आहे. ती बारीपाड्यात जन्मली असून मुंबईच्या सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकली आहे.

‘बवंडर’, ‘1947 अर्थ’, ‘फायर’, ‘भंवरी देवी’ या चित्रपटात नंदिताने काम केले आहे. याशिवाय तिने दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. ‘मंटो’ चित्रपट तिच्या दिग्दर्शनाखाली बनलेला लोकप्रिय चित्रपट आहे. आमिर खानसोबत चित्रपट केल्यावर ती खूप चर्चेत आली होती. यानंतर तिचे आणखी एक-दोन चित्रपट आले. शाहरुख खानसोबतही नंदिताने एक मोठा चित्रपट साईन केल्याची बातमी आली होती. पण तो का बनला नाही, याबद्दल कोणालाही माहिती मिळाली नाही.

वृत्तानुसार, नंदिताला असे वाटते की तिला दिग्दर्शनापेक्षा अभिनयाची जास्त आवड आहे. अभिनयामध्ये कोणताही ताण नसतो, तुमच्यावर जास्त भारही नसतो. याव्यतिरिक्त दिग्दर्शन करणे खूप जड काम आहे. एखादा चित्रपट करताना आपण किती काम केले हेही आपल्याला कळत नाही.

दोनदा लग्न होऊन घटस्फोट घेतलेली नंदिता, महिलांच्या बाबतीत खूप मोकळ्या मनाने बोलत असते. काही वेळा ती वादाचाही भाग बनते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जागतिक कॅन्सर दिन: बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी केली कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात

‘ही’ अभिनेत्री लढतेय कॅन्सरसोबत, सोशल मीडियावर केस फोटो आत्मविश्वासाने केले पोस्ट

हे देखील वाचा